S M L

भारतीय जवानाचं पाकला जशाच तसे उत्तर, आॅईल डेपोसह 4 चौक्या नेस्तनाबूत !

भारतीय जवानांनी जशाच तसे उत्तर देत पाकिस्तानच्या चार चौक्या नेस्तनाबूत केल्या आहेत.

Sachin Salve | Updated On: Jan 22, 2018 11:39 PM IST

भारतीय जवानाचं पाकला जशाच तसे उत्तर, आॅईल डेपोसह 4 चौक्या नेस्तनाबूत !

22 जानेवारी : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापत्या सुरूच आहे. भारतीय जवानांनी जशाच तसे उत्तर देत पाकिस्तानच्या चार चौक्या नेस्तनाबूत केल्या आहेत. तसंच बीएसएफने पाकचा एक इंधन साठाही उद्धवस्त केलाय.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार सीमारेषवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. आज सोमवारीही पाककडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानाकडून जम्मू आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करण्यात आलाय. याला बीएसएफ जवानांनी जशाच तसे उत्तर दिले. बीएसएफ जवानांच्या कारवाईत पाकच्या चार चौक्या, शस्त्रसाठा आणि तेल डेपो उद्धवस्त झालाय. बीएसएफकडून एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आलाय. यात पाकचा तेल डेपा उद्धवस्त झाल्याचं स्पष्ट दिसतंय.

जम्मू सीमेवर पाकिस्तानकडून गुरुवारपासून गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात आतापर्यंत पाच सुरक्षाकर्मचारी आणि 12 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झालाय तर 60 हुन अधिक जण जखमी झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2018 11:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close