Home /News /national /

1 लाखांचा टप्पा पार करूनही भारतासाठी दिलासादायक बातमी

1 लाखांचा टप्पा पार करूनही भारतासाठी दिलासादायक बातमी

पावसाळ्यात वाढणाऱ्या आर्द्रतेवर तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार, वाढत्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू आणखी धोकादायक होईल. तर काही तज्ज्ञांच म्हणणं आहे की, आर्द्रतेमुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी होईल. खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे थेंब बाहेर पडतात. आर्द्रतेमुळे हे थेंब मोठे होतात आणि खाली पडतात. याचा तसा शरीरावर परिणाम कमी होतो.

पावसाळ्यात वाढणाऱ्या आर्द्रतेवर तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार, वाढत्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू आणखी धोकादायक होईल. तर काही तज्ज्ञांच म्हणणं आहे की, आर्द्रतेमुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी होईल. खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे थेंब बाहेर पडतात. आर्द्रतेमुळे हे थेंब मोठे होतात आणि खाली पडतात. याचा तसा शरीरावर परिणाम कमी होतो.

भारतानं आज 1 लाखांचा टप्पा पार केला. एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होतच आहे.

    नवी दिल्ली, 19 मे : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतानं आज 1 लाखांचा टप्पा पार केला. एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होतच आहे. दरम्यान, भारतानं एक लाखांचा आकडा पार केला असला तर गेल्या 24 तासांत भारतात 4970 नवीन रुग्णांची वाढ झाली तर 134 लोकांचा मृत्यू झाला. यामुळं आता एकूण मृतांच्या संख्या 3163 झाली आहे. असे असले तरी, भारतासाठी एक दिलासादायक बातमीही आहे. भारतानं एक लाखांचा आकडा पार करत त्या 11 देशांमध्ये समावेश केला आहे जिथे 1 लाखांपेक्षा जास्त बाधित आहेत. पण Active रुग्ण असलेल्या 7 देशांमध्येही भारताचा समावेश होणार आहे. स्पेन (Spain), इराण (Iran)सह फक्त चार देशांमध्येच भारतापेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र तिथे Active रुग्णांची संख्या कमी आहे. असे असले तरी, भारतातील मृतांचा आकडा हा एकूण रुग्णांपेक्षा कमी आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा निरोगी झालेल्या रुग्णांची आकडेवारी जास्त महत्त्वाची आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 2% लोकांचाही कोरोनानं मृत्यू झालेला नाही आहे. भारतानं एक लाखांचा आकडा पार केला असला तरी, भारतात मृतांच्या आकडेवारीपेक्षा निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे. वाचा-फक्त 12 दिवसात तब्बल 50 हजार नवीन रुग्णांची नोंद, असा वाढला कोरोनाचा ग्राफ वाचा-कोरोनाला हरवण्याचा भारताचा प्रयत्न फसला, रुग्णांवर 'ते' खास व्हेंटिलेटर फेल नीति आयोगचे सीईओ अभिषेक कांत यांनी भारतातील निरोगी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत माहिती दिली.  भारतात आतापर्यंत जवळजवळ 37 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचा अर्थ भारतात कोरोना बरा होण्याची आकडेवारी इतर देशांपेक्षा जास्त आहे. भारतात निरोगी रुग्णांची संख्या आता 38% आहे. तसेच, 1 लाख कोरोना रुग्णांच्या तुलनेत भारतात आतापर्यंत 3163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये असा कोरोनाचा ग्राफ देशात लॉकडाऊनच्या काळातच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. 25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा आता सध्या चौथा टप्पा सुरू आहे. त्यावेळी देशात कोरोनाव्हायरसचे 606 रुग्ण होते. त्यानंतर 14 एप्रिलला पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यावेळी कोरोनाबाधितांच्या संख्या 11 हजार 439 झाली. दुसरा लॉकडाऊन 3 मेपर्यंत चालला. यादरम्यान रुग्णांची संख्या 42 हजार 533 झाली. तर तिसरा लॉकडाऊन 17 मेला संपला. केवळ 12 दिवसात भारतात तब्बल 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन मे अखेरपर्यंत लागू करण्यात आला आहे. 1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण लॉकडाऊन 4.0च्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 96 हजार 169 झाली. तर दुसऱ्या दिवशी भारतानं एक लाखांचा आकडा पार केला. देशात सोमवारी कोरोनामुळं मृत झालेल्या लोकांची एकूण संख्या 3029 झाली. तर, कोरोनाबाधितांचा आकडा आता 96 हजार 169वर जाऊन पोहचला होता. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 5242 नवीन प्रकरणं समोर आली होती. तर, 157 लोकांचा मृत्यू झाला होता. वाचा-ICMRने कोरोना टेस्टच्या नियमात केले मोठे बदल, आता 'या' लोकांचीही होणार चाचणी
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या