देशभरात गेल्या 24 तासांत 28 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 826 नवे रुग्ण आढळले

देशभरात गेल्या 24 तासांत 28 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 826 नवे रुग्ण आढळले

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 759 झाली आहे तर मृतांचा आकडा 420 वर पोहोचला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 एप्रिल: देशभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत 28 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 826 नवे रुग्ण आढळले आहेत. आता देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 759 झाली आहे तर मृतांचा आकडा 420 वर पोहोचला आहे. देशात 1 हजार 515 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचा...सोलापुरात कोरोनाचा फैलाव झाला कोठून? एकाच दिवशी आढळले 10 पॉझिटिव्ह रुग्ण

मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, आतापर्यंत 2, 90, 401 नागरिकांची कोविड-19 ( COVID-19) टेस्ट करण्यात आली आहे. देशात 12 हजार 759 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 420 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 515 जण बरे झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशातील 525 जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेली नाही.

पाच लाख नवी रॅपिड टेस्ट किट देशात आले आहेत. परंतु, त्याचा वापर सुरुवातीच्या चाचणीसाठी केला जात नाही. याचा वापर निगराणीसाठी केला जातो. हॉटस्पॉट परिसरातील ट्रेंड पाहिल्यानंतर त्याचा वापर करण्यात येईल.

हेही वाचा...आता या शहराला घोषित केलं कोरोनाचं हॉटस्पॉट, अत्यावश्यक सेवाही बंद

दुसरीकडे, महाराष्ट्रातून आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर तीन हजारांच्या आसपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

एकीकडे ही आकडेवारी असली तरी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे 265 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात असून समाजातूनही या रुग्णांचे स्वागत केले जात आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 16, 2020, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading