'कोरोना'चा धोका वाढला ! भारतात एकूण 6 रुग्ण, आणखी 6 जणांना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता

'कोरोना'चा धोका वाढला ! भारतात एकूण 6 रुग्ण, आणखी 6 जणांना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता

भारतात (India) कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) एकूण 6 रुग्ण (pateient) आढळून आलेत. केरळमधील पहिले 3 रुग्ण बरे झालेत, इतर तिघांवर उपचार सुरू आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मार्च  : केरळमधील 3 रुग्णांनंतर आता नवी दिल्ली, तेलंगणा आणि जयपूरमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण आहे. राजस्थानच्या जयपूरमधील पर्यटकाला कोरोनाव्हायरस (Coronavirus) असल्याचं स्पष्ट झालं आहे. या रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

त्यामुळे भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण 6 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी केरळमधील पहिले 3 रुग्ण बरे झालेत तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आणखी 6 जणांना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

संबंधित - 'कोरोना'शी लढ्याचं 'केरळ मॉडेल', भारतातील पहिले 3 रुग्ण असे झाले व्हायरसमुक्त

उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह (Health Minister Jai Pratap Singh) यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीत सांगितलं की, 'आग्रामधील 6 व्यक्तींमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलं. या सर्वांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील नॅशन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल लॅबोरेटरीत पाठवण्यात आलेत.'

'हे सर्व जण दिल्लीतील कोरोनाव्हायरसच्या रुग्णाच्या संपर्कात आले होते, जो इटलीहून आला होता. या संशयित रुग्णांच्या कुटुंबातील 23 लोकांचे सॅम्पलही पुण्यात पाठवण्यात आलेत. या सर्वांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

केंद्र सरकारकडून हेल्पलाईन नंबर आणि नवीन प्रवास नियमावली

कोरोनाव्हासबाबत माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या 91-11-23978046 क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही मदत मागू शकता, तुमच्या प्रश्नांचं निरसन करू शकता. नाहीतर ncov2019@gmail.com या ई-मेल आयडीवरही तुम्ही मेसेज करू शकता.

शिवाय चीनमधील भारत दूतावासानंही मदतीसाठी 8618610952903 और 8618612083629 हे 24x7 हॉटलाइन आणि  helpdesk.beijing@mea.gov.in हा ई-मेल जारी केला आहे.

संबंधित - महाराष्ट्रात कोरोनाचा संशयित रुग्ण; तुम्हालाही होऊ शकतो व्हायरस, असा करा बचाव

कोरोना संक्रमणाच्या भीतीने केंद्र सरकारने 4 देशांच्या नागरिकांचे व्हिसा रद्द केलेत. इराण, इटली, जपान, दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे.

First published: March 3, 2020, 7:05 PM IST

ताज्या बातम्या