भारतात कोरोनाव्हायरसचा तिसरा रुग्ण; भीती वाढली, केंद्र सरकारने दिला Alert

भारतात कोरोनाव्हायरसचा तिसरा रुग्ण; भीती वाढली, केंद्र सरकारने दिला Alert

भारतात कोरोनाव्हायरसच्या (Coronovirus) रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यामुळे भारतातल्या नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो चीनला जाऊ नये, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. शिवाय चीनचा पासपोर्ट असलेल्या नागरिकांसाठी e-Visa सुविधाही भारतानं तात्पुरती बंद केली आहे.

  • Share this:

कोची, 3 फेब्रुवारी : देशातल्या नागरिकांनो सावध राहा ! कारण भारतात कोरोनाव्हारसच्या (Coronovirus) रुग्णांची संख्या वाढली आहे. केरळात कोरोनाव्हायरसचा तिसरा रुग्ण सापडला आहे. केरळच्या कासरगोडेतील असलेला हा व्यक्ती काही दिवसांपूर्वीच चीनच्या (China) वुहानमधून (wuhan) भारतात परतला होता, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. सध्या हा रुग्ण वैद्यकीय देखरेखीत आहे.

केरळात तब्बल 2 हजार वैद्यकीय देखरेखीत

चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 350 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनहून केरळात आलेल्या एकूण 1,999 व्यक्तींना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. कोरनाव्हायरसची लागण झालेल्या इतर 2 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केरळ सरकारने दिली आहे. चीनमध्ये असलेल्या एकूण 647 भारतीयांना भारतात आणण्यात आलं आहे, त्यांनाही हरयाणातल्या मानेसरमध्ये विशेष मेडिकल कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने जारी केले निर्देश

चीनमधील परिस्थिती पाहता देशातल्या नागरिकांनी चीनमध्ये जाऊ नये, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.

तसंच चीनचा पासपोर्ट असलेल्या प्रवाशांसाठी ई-व्हिजा (e-Visa) सुविधाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ज्यांना याआधी ई-व्हिजा देण्यात आला आहे, तो आता वैध नाही असंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे.

अन्य बातम्या

काय सांगता! डेटॉलचे लिक्विड कोरोना व्हायरसचा खात्मा करू शकतात?

First published: February 3, 2020, 2:49 PM IST

ताज्या बातम्या