Home /News /national /

भारतात कोरोना रुग्णांची संख्या गेली 30 लाखांच्यावर, केंद्राने बोलावली बैठक

भारतात कोरोना रुग्णांची संख्या गेली 30 लाखांच्यावर, केंद्राने बोलावली बैठक

शुक्रवारी दिवसभरात 1,145 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 2,56,507 एवढी झाली आहे.

शुक्रवारी दिवसभरात 1,145 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 2,56,507 एवढी झाली आहे.

शनिवारी एकाच दिवसांत देशात तब्बल 10 लाख टेस्ट झाल्या असून हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो.

    नवी दिल्ली 22 ऑगस्ट: भारतात कोरोना व्हायरच्या नव्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शनिवारी देशातल्या एकूण रुग्णांच्या संख्येने 30 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. या आधी एकाच दिवसांत सर्वाधिक 69,878 रुग्ण आढळले होते. तर आत्तापर्यंत 55,794 मृत्यू झाले आहेत. तर शनिवारी एकाच दिवसांत देशात तब्बल 10 लाख टेस्ट झाल्या असून हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. जास्त टेस्ट होत असल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे. तर बदलत्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून त्यात राज्यवार आढावा घेतला जाणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी राज्यात 14 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 14,492 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 297 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 6,61,942 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 4,80,114 एवढे रुग्ण बरे झाले आहेत. तर 1,69,516 एवढ्या रुग्णांवर राज्यात उपचार सुरु आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मृत्यूची संख्या पोहोचली 8 लाखांवर; जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 2 कोटींपार देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेले काही दिवस तर 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण एकाच दिवशी सापडत आहेत. रुग्ण संख्या वाढत असतांनाच काही नवीन गोष्टीही समोर येत आहेत. हैदराबादमध्ये केलेल्या एका अभ्यासात कोरोना व्हायरसचे नमुने हे सांडपाण्यातही आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सेंटर फॉर मॉलिक्युलर बॉयलॉजी (CCMB)ने याबाबतचा अभ्यास केला आहे. Unlock 3:  प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध उठवा, केंद्राने राज्यांना फटकारलं हे व्हायरस संसर्गजन्य असल्याचं अद्याप आढळून आलेलं नाही. मात्र एखाद्या भागात कोरोनाचा किती संसर्ग झाला हे यातून कळायला मदत होईल असा अंदाज CCMBच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोना विरुद्धच्या उपाय योजना करतांना या निष्कर्षांची मोठी मदत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या