Home /News /national /

Coronavirus चा कहर! सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद, सरकारचा निर्णय

Coronavirus चा कहर! सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद, सरकारचा निर्णय

प्रसिद्ध शाळेत विद्यार्थ्याला कोरोना व्हाaयरसचे लक्षण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. ह्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्रसिद्ध शाळेत विद्यार्थ्याला कोरोना व्हाaयरसचे लक्षण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. ह्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भारतातील (India) कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका पाहता खबरदारी म्हणून दिल्लीतील (Delhi) सर्व प्राथमिक शाळा (Primary school) 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.

  नवी दिल्ली, 05 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या 29 झाली आहे. भारतातही कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यामुळे खबरदारी म्हणून दिल्लीतील शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्यात. दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा बंद करण्याचे निर्देश दिल्ली सरकारने दिलेत, अशी माहिती शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "देशात कोरोनाव्हायरसचा धोका पाहता, व्हायरस जास्त पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिल्ली सरकारने दिलेत. यामध्ये सरकारी, खासगी अशा सर्व शाळांचा समावेश आहे", असं सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. संबंधित - जीवघेणा ‘कोरोना’! या व्हायरसची लागण झाल्यास खरंच मृत्यू अटळ आहे का? दिल्लीमधील एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आग्र्यातील (Agra) 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर जयपूर (Jaipur) येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन (Italian) ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाली आहे. हैद्राबादमध्ये (Hyderabad) एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या केरळात (Kerala) 3 बाधित रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. हे वाचा - Coronavirus पासून वाचण्यासाठी हँड सॅनियटायझरचा अतिवापर, इतर आजारांना आमंत्रण दरम्यान कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जिअम दौराही रद्द करण्यात आला आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Coronavirus, Coronavirus in delhi, Coronavirus in india

  पुढील बातम्या