भारतात कोरोनाचा धोका वाढला ! आणखी 4 रुग्णांना व्हायरस, तर एक संशयितही सापडला

भारतात कोरोनाचा धोका वाढला ! आणखी 4 रुग्णांना व्हायरस, तर एक संशयितही सापडला

 कोलकाता (Kolkata), केरळात (Kerala) प्रत्येकी 2 रुग्ण तर दिल्लीत (Delhi) एक संशयित रुग्ण दिसून आला आहे. देशातील कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी  - भारतात (India) कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका वाढतो आहे. देशात कोरोनाव्हायरसचे आणखी 4 रुग्ण आणि एक संशयित सापडला आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता विमानतळावर (Kolkata airport) व्हायरसचे 2 रुग्ण सापडलेत. थर्मल स्क्रिनिंगमध्ये (thermal screening)  त्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं. हे दोघंही आज (गुरुवारी) कोलकात्याला पोहोचले. तर दुसरीकडे केरळ सरकारनेही आपल्या इथे आणखी 2 कोरोनाव्हायरसचे रुग्ण सापडल्याची माहिती दिली, हे दोघंही नुकतेच चीनहून परतलेत.

हेदेखील वाचा - भारताने 'कोरोना'विरोधातील लढा जिंकला ! केरळातील दुसऱ्या रुग्णाला डिस्चार्ज

दिल्लीत कोरोनाव्हायरसचा संशयित

दरम्यान कोरोनाव्हारसचा संशयित रुग्ण बँकॉकहून दिल्लीत पोहोचला आहे, अशी माहिती सूत्रानी दिली आहे. स्पाइसजेटच्या विमानातून हा संशयित बँकॉकहून दिल्लीत आला. विमानातील 31एफ सीट वर हा संशयित रुग्ण बसला होता. त्याच्या शेजारील इतर सीटवर कुणीच नव्हतं. लँडिगनंतर संशयित रुग्णाला इतरांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे.

देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढते आहे, याबाबत केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. या आम्ही सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr Harshvardhan)  यांनी सांगितलं.

डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर आतापर्यंत 2,51,447 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे, याशिवाय 12 प्रमुख आणि 65 छोट्या बंदरांवरही स्क्रिनिंग होतं आहे.

हेदेखील वाचा - पुरुष की महिला कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला? संशोधनात समोर आली धक्कादायक

चीनमध्ये कोरोनाचे 1,367 रुग्ण

भारतातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे, तर दुसरीकडे चीनमधील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. एका दिवसात (गुरुवारी) कोरोनाव्हायरसमुळे 254 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता 1,367 झाली आहे.  आतापर्यंत 60,000 रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

तुम्हाला कोरोनाव्हायरस झाला की नाही हे कसं समजलेल?

कोरोनाची लक्षणं ही सर्वसामान्य लक्षणांसारखीच आहेत. सुरुवातीला डोकेदुखी, नाक वाहणं, खोकला, घसा खवखवणे, ताप, शरीरात थकवा, शिंका येणे अशी लक्षणं दिसून येतात आणि हळूहळू रुग्णांना न्युमोनिया असल्यासारखं वाटतं. कोरोनाव्हायरस फुफ्फुसावर हल्ला करतो आणि त्यामुळे कमजोरी येते. शरीर इतकं कमजोर होतं, की कोरोनापासून वाचणं अशक्य होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 08:13 PM IST

ताज्या बातम्या