मराठी बातम्या /बातम्या /देश /आता पाकिस्तानही बनवणार जीवघेणा व्हायरस, चीनशी झाला गुप्त करार

आता पाकिस्तानही बनवणार जीवघेणा व्हायरस, चीनशी झाला गुप्त करार

हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती डॉ. जनक यांनी व्यक्त केली आहे. लोकांनी जास्तित जास्त काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती डॉ. जनक यांनी व्यक्त केली आहे. लोकांनी जास्तित जास्त काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या संकटात असताना चीन अशा प्रकारे कुरापती करत आहे. कोरोना हा चीनमधून पसरल्याचा अनेक देशांचा दावा आहे.

dfनवी दिल्ली, 25 जुलै : देशावर कोरोनामुळे आधीच मोठं संकट आलं असताना आता भारताच्या अडचणी आणखी वाढवण्यासाठी देशाचे दोन शत्रू देश हे मोठा कट रचत आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला असून, त्याअंतर्गत चीन पाकिस्तानला जैविक शस्त्रं बनविण्यास मदत करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटात असताना चीन अशा प्रकारे कुरापती करत आहे. कोरोना हा चीनमधून पसरल्याचा अनेक देशांचा दावा आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानबरोबर जैविक शस्त्रं बनवण्याची बाब अत्यंत धोकादायक आणि गंभीर आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गुप्तचर यंत्रणांनी खुलासा केल्याल्या माहितीनुसार, पाकिस्तान सैन्याच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संघटनेशी (डीईटीओ) चिनी लॅबने एक गुप्त करार केला आहे. या कराराअंतर्गत, दोन्ही देश संसर्गजन्य रोग आणि त्यावर नियंत्रण कसं ठेवायचं यावर संयुक्तपणे संशोधन करणार आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ज्या लॅबमधून कोरोनासारखा जीवघेणा विषाणू लिक झाला होता त्याच लॅबमध्ये हा करार करण्यात आला आहे. म्हणजेच हा करार वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीसोबत करण्यात आला आहे. या दोन्ही देशांमध्ये झालेला हा करार भारतासाठी धोक्याचा असल्याचं गुप्तचर यंत्रणेनं म्हटलं आहे.

'60 वर्षात आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष दिले नाही', नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?

चीनचा डाव

या सगळ्या घटनांवरून मोठा अनर्थ घडवण्यासाठी पाकिस्तान चीनचा वापर करत असल्याचं बोललं जात आहे. कारण कोरोनानंतर सगळेच देश हे चीनवर भडकले आहेत. त्यामुळे आपल्या देशाला सगळ्या सीमा तोडून आपल्या जैविक शस्त्रास्त्रांची चाचणी करण्याचा पाकिस्तानचा प्लान आहे. यामुळे जरी एकादी जैविक दुर्घटना झाली तर चीनवर सगळा राग निघू शकतो. यात महत्त्वाचं म्हणजे हे प्राणघातक विषाणू आणि जीवाणूंचा सामना करण्यासाठी ज्या प्रकारच्या लॅब्सची गरज आहे त्या पाकिस्तानात नाहीत.

काय आहे करार?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, The Klaxon च्या हवाल्याने, भारताच्या सुरक्षेसाठी गुप्तहेर यंत्रणा सध्या चिंतेमध्ये आहे. या कराराच्या नावाखाली चीनला भारत आणि पश्चिम देशांचं नुकसान करायचं आहे असा त्यांचा संशय आहे. तसंच पाकिस्तानचा यात फायदा असा की पुढे कोणतीही समस्या दिसली तरी ते माघार घेऊ शकतात. "Collaboration for Emerging Infectious Diseases and Studies on Biological Control of Vector Transmitting Diseases" असं या कराराला नाव देण्यात आलं आहे.

चीन आणि पाकिस्तानच्या या कराराअंतर्गत धोकादायक जीवाणू आणि विषाणूंवर अभ्यास केला जाईल. यासाठी पाकिस्तानला वुहान लॅब प्रशिक्षण देणार असून चीन सरकार आर्थिक मदतही करणार आहे. विषाणू आणि बॅक्टेरियांचा साठा तयार करण्यासाठी चीन स्वत: पाकिस्तानला मदत करत आहे अशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: China, Corona virus in india, Coronavirus, Pakistan