मोदींचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न या क्षेत्रात झालं पूर्ण; आता जगाला करतो PPEs चा पुरवठा

मोदींचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न या क्षेत्रात झालं पूर्ण; आता जगाला करतो PPEs चा पुरवठा

गेल्या महिन्याभरात 23 लाख PPE kit निर्यात केल्या आहेत. 3 महिन्यांपूर्वी भारतात एकही PPE किट तयार होत नव्हती.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. तो एवढ्या कमी कालावधीत प्रत्यक्षात येईल, असं जगात कुणालाच वाटलं नसेल. पण भारताने अवघ्या 3 महिन्यात मेडिकल किटच्या आघाडीवर तरी हे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न खरं करून दाखवलं आहे. एवढंच नव्हे, तर आज जगाला PPE किट पुरवणारा महत्त्वाच देश भारत झाला आहे.

अवघ्या 3 महिन्यांपूर्वी भारतात एकही PPE किट तयार होत नव्हती. Coronavirus ची साथ सुरू झाली तेव्हा बचावासाठीचं हे शिरस्त्राण परदेशातूनच महागड्या किमतीत मागवावं लागत होतं. आता मात्र भारत PPE किट निर्माण करणारा जगातली सर्वात महत्त्वाचा देश झाला आहे. एवढंच नाही तर, अमेरिका, ब्रिटन, दुबई या देशांना आपण या अत्यावश्यक मेडिकल किट निर्यातही करू लागलो आहोत.

भारत सरकारतर्फे दिल्या गेलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे की, गेल्या महिन्याभरात 23 लाख PPE kit निर्यात केल्या आहेत. केवळ महिन्याभराचा हा आकडा थक्क करणारा आहे.

केंद्र सरकारने आतापर्यत 1.28 कोटी PPE किट्स देशाच्या विविध भागात पाठवल्या आहेत. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा पुरवठा झाला आहे. आता देशाची गरज भागवून उरलेला माल जगभरात निर्यात होतो आहे. 23 लाख PPE किट गेल्या महिन्याभरात भारताने निर्यात केल्या आहेत.

मेडिकल तंत्रात अद्ययावत समजल्या जाणाऱ्या UK, USA, UAE या देशांना भारताकडून PPE किटचा पुरवठा सध्या होतो आहे. त्याबरोबर स्लोव्हानिया आणि सेनेगल या देशांनाही भारतीय PPE किट गेल्या आहेत.

जगात आता या क्षेत्रात भारत अव्वल ठरला आहे. PPEs तयार करणारा भारत जगभरातला महत्त्वाचा देश आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 14, 2020, 3:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या