14 दिवसात देशात 70 हजार नवीन रुग्णांची नोंद, तरी आली एक दिलासादायक बातमी

14 दिवसात देशात 70 हजार नवीन रुग्णांची नोंद, तरी आली एक दिलासादायक बातमी

केवळ 2 आठवड्यात भारतात तब्बल 70 हजार रुग्णांची नोंद झाली. असे असले तरी, भारतासाठी या परिस्थितीत एक दिलासादायक बातमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : भारतात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात सध्या 1 लाख 45 हजारहून अधिक रुग्ण आहेत. मंगळवारी देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus India) मृत्यूची संख्या 4167 वर पोहोचली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Mohfw Covid Data) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 80 हजारावर पोहोचली आहे, तर बरे झालेल्या लोकांची संख्या 60 हजारवर पोहचली आहे. केवळ 2 आठवड्यात भारतात तब्बल 70 हजार रुग्णांची नोंद झाली. असे असले तरी, भारतासाठी या परिस्थितीत एक दिलासादायक बातमी आहे.

भारतात 20 ते 25 दरम्यान रोज 6200 रुग्णांची नोंद दररोज होत आहे. ही गती अशीच राहिल्यास 26 मे ते 1 जून पर्यंत हा आकडा 2 लाख 23 हजार 200 पर्यंत जाऊ शकतो. मात्र यातही भारतात निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार होत असला तरी लोक त्यावर मात ही करत आहेत. हा आकडाही वाढता असल्यामुळे ही बाब भारतासाठी दिलासादायक आहे.

राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या

राज्यात अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 33, आंध्रमध्ये 1896, अरुणाचल प्रदेशात 1, आसाममध्ये 62, बिहारमधील 749, चंदीगडमध्ये 186, छत्तीसगडमध्ये 72, दादर नगर हवेलीतील एकही रुग्ण बरे झाल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीत 6771, गोव्यात 19, गुजरातमध्ये 6636, हरियाणामध्ये 765, हिमाचल प्रदेशात 67. महाराष्ट्रमध्ये 15786, जम्मू-काश्मीरमध्ये 809, कर्नाटकात 705, केरळमध्ये 705, लडाखमध्ये, 43, मध्य प्रदेशात 3571, मणिपूरमध्ये 4, मेघालयात 12, मिझोरममध्ये 1, नागालँडमध्ये 0, ओडिशामध्ये 649, पुडुचेरीमध्ये 12, राजस्थानमधील 3951, सिक्किम 0, तेलंगाना 1164, त्रिपुरा 165, उत्तराखंडमध्ये 58, उत्तर प्रदेशमध्ये 3581, पश्चिम बंगालमधील 1414 रुग्ण बरे झाले आहेत.

या राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही

एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या लाखांच्या घरात गेली असताना देशात असं एक केंद्रशासित प्रदेश आहे जेथे आतापर्यंत एकही रुग्ण सापडला नाही आहे. लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडल्याची नोंद नाही आहे. लक्षद्वीप आपल्या भौगोलिक स्थितीमुळे कोरोनामुक्त राहिला आहे. येथे छोटे छोटे 36 द्वीपांचा एक समूह आहे, ज्याची लोकसंख्या 64 हजार आहे.

First published: May 26, 2020, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading