Home /News /national /

शाब्बास ! भयंकर 'कोरोना'वर भारताने केली मात, पहिल्या रुग्णालाही लवकरच डिस्चार्ज

शाब्बास ! भयंकर 'कोरोना'वर भारताने केली मात, पहिल्या रुग्णालाही लवकरच डिस्चार्ज

चीनच्या (China) वुहानहून (Wuhan) भारतात (India) परतलेल्या सर्व भारतीयांची कोरोनाव्हारसची टेस्ट नेगेटिव्ह (Coronavirus negative test) आली आहे.

    थ्रिसुर, 19 फेब्रुवारी :  कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धसका संपूर्ण जगानं घेतला आहे, भारतानं मात्र आता सुटकेचा श्वास सोडला आहे. कारण चीनच्या (China) वुहानहून (Wuhan) भारतात परतलेल्या सर्व नागरिकांची कोरोनाव्हायसची टेस्ट नेगेटिव्ह (Coronavirus negative test) आली आहे. केरळात आढळलेल्या तिन्ही रुग्णांच्या टेस्टचे दोन्ही रिपोर्ट नेगेटिव्ह आलेत. शिवाय ज्या नागरिकांना वेगळं ठेवण्यात आलं त्या सर्वांनाही आता घरी पाठवण्यात आलं आहे. पहिल्या रुग्णाला लवकरच डिस्चार्ज वुहानहून केरळात परतलेल्या 3 भारतीयांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या रुग्णाच्या टेस्टचे 2 अहवाल नेगेटिव्ह आले, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता पहिल्या रुग्णाला कधी डिस्चार्ज मिळेल याची प्रतीक्षा सर्वांना आहे. 30 जानेवारीला चीनहून भारतात आलेल्या या रुग्णाला थ्रिसुर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 'मनोरमा'ने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या रक्ताच्या नमुन्यांच्या अंतिम चाचणीचा अहवालही आता नेगेटिव्ह आला आहे, असं मात्र गुरुवारी मेडिकल बोर्डची बैठक होईल आणि त्यामध्ये त्याच्या डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाईल. वेगळं ठेवलेल्या भारतीयांनाही घरी सोडलं चीनच्या वुहानमध्ये कोरोनाव्हायरस झपाट्याने पसरल्यानंतर तिथं असलेल्या भारतीय नागरिकांना भारत सरकारने विशेष विमानाने भारतात आणलं. मात्र त्यांना दिल्लीत आयटीबीपीच्या केंद्रात काही दिवस वेगळं ठेवण्यात आलं होतं. कोरोनाची कोरोनाची अंतिम चाचणी झाल्यानंतर सर्व 406 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तब्बल 19 दिवसांनंतर या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. चीनमध्ये 2000 मृत्यू चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या मृतांची संख्या वाढतेच आहे. बुधवारपर्यंत कोरोनाव्हायरसमुळे 2000 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 74,000 जणांना याची लागण झाली आहे. हुबेई प्रांतातील सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा प्रांत म्हणजे कोरोनाव्हायरसचा केंद्रबिंदू आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: China, Coronavirus, India

    पुढील बातम्या