मराठी बातम्या /बातम्या /देश /

अमेरिकेपेक्षा भारताची स्थिती चांगली, ओलांडला 10 लाख कोरोना टेस्टचा टप्पा

अमेरिकेपेक्षा भारताची स्थिती चांगली, ओलांडला 10 लाख कोरोना टेस्टचा टप्पा

भारतात मृत्यू तर हा 3.2 एवढा असून इतर देशांच्या मानाने तो चांगला असल्याचं मानलं जात आहे. भारताने 10 लाख टेस्ट केल्यानंतर 39,980 रुग्ण आढळून आलेत. तर 10 लाख टेस्टनंतर अमेरिकेत 1,64,620

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली 03 मे : देशात कोरोनाचा उद्रेक वाढतोच आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढते आहे. अशा स्थितीत भारताने तब्बल 10 लाख कोरोना टेस्टचा टप्पा ओलांडला आहे. आत्तापर्यंत 10 लाख टेस्ट केलेल्या विकसित देशांपेक्षा भारताची कामगिरी चांगली असल्याचं आढळून आलं आहे. ज्या मोठ्या 5 देशांनी 10लाख टेस्ट केल्यात त्यांच्या तुलनेत भारतातल्या रुग्णांची संख्या कमी आहे. भारतातल्या रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या जवळ गेला आहे. तर आत्तापर्यंत 1301 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 10,633 जण बरे झाले आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाला रोखण्यात मोठ्या प्रमाणावर यश आल्याचंही बोललं जात आहे. भारतात मृत्यू तर हा 3.2 एवढा असून इतर देशांच्या मानाने तो चांगला असल्याचं मानलं जात आहे. ज्या मोठ्या 5 देशांनी 10लाख टेस्ट केल्यात त्यांच्या तुलनेत भारतातल्या रुग्णांची संख्या कमी आहे. भारताने 10 लाख टेस्ट केल्यानंतर 39,980 रुग्ण आढळून आलेत. तर 10 लाख टेस्टनंतर अमेरिकेत 1,64,620, जर्मनीमध्ये 73,522, स्‍पेनमध्ये 2,00,194 तुर्कीमध्ये 1,17,589 इटलीत 1,52,271 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे भारताची स्थिती चांगली असल्याचं बोललं जात आहे. सावधान! ही स्मार्टफोन कंपनी तुमची माहिती चोरून पाठवते चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे ज्या 1,301 जणांचा मृत्यू झाला त्यात सर्वाधिक 512 जण महाराष्ट्रातले आहेत. त्यानंतर गुजराज 262, मध्यप्रदेश 151, राजस्थान 65, दिल्ली 64, उत्तर प्रदेश 43 आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 33 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या कोरोनाव्हायरसचे (coronavirus) 34 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत आणि 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसचं हे थैमान कधी थांबणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. मात्र जोपर्यंत जगातील 70 टक्के लोकसंख्या संक्रमित होत नाही, तोपर्यंत कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवता येणार नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पुण्यात कोरोनाचे 22 हॉटस्पॉट...पण पालिकेकडून उपाययोजना नाहीत, गंभीर आरोप याआधी भारतात कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी हर्ड इम्युनिटीची थिएरी दिली आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या मते, भारतातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला संक्रमित होऊन व्हायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्ती विकसित करावी लागेल. आता भारताबाहेरील शास्त्रज्ञांनी हर्ड इन्युनिटीबाबत नव्यानं रिसर्च करण्यात आला आहे.
First published:

पुढील बातम्या