भारताचा दणका, चिनी सैन्याने मागे हटण्याची दाखवली तयारी; असा आहे फॉर्म्युला

 भारताचा दणका, चिनी सैन्याने मागे हटण्याची दाखवली तयारी; असा आहे फॉर्म्युला

India-China Ladakh Border Tension: कुठल्याही परिस्थित दबावाला बळी पडणार नाही असं भारताने दाखवून दिलं आहे. एवढच नाही तर आक्रमकपणे सीमेवर सज्जताही सुरू केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 11 नोव्हेंबर: India-China Ladakh Border Tension गेल्या 8 महिन्यांपासून लडाख सीमेवर भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेला तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत. दिवाळी (Diwali)आधीच यावर गोड बातमी मिळू शकते असी माहिती संरक्षण विभागातल्या सूत्रांनी दिली आहे. भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या 8व्या फेरीत यासंबधीच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य होतं त्याच ठिकाणी पुन्हा सैनिक परतणार आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.

कुठल्याही परिस्थित दबावाला बळी पडणार नाही असं भारताने दाखवून दिलं आहे. एवढच नाही तर आक्रमकपणे सीमेवर सज्जताही सुरू केली होती. त्याचामोठा दणका चीनला बसला आहे. भारताशी संघर्ष परवडणारा नाही हे लक्षात आल्याने चीनने आपलं सैन्य मागे हटवण्याची तयारी दाखवली.

6 नोव्हेंबरला चुशूल इथं दोन्ही देशांच्या कमांडर स्तरावरच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात तोडग्यावर सहमती झाल्याचं सांगितलं जात आहे. तीन टप्प्यात यासंबंधात कार्यवाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात पॅगोंग लेक परिसरातून टँक आणि सैन्यिक आपल्या पूर्वीच्या जागी जातील. दुसऱ्या टप्प्यात दररोज 30 टक्के सैनिक या भागातून हटविण्यात येतील. ही प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे. त्यानंतर चिनी सैनिक फिंगर 8 जवळ परतणार आहे. तर भारताचे सैनिक पूर्वीच्या धान सिंह थापा पोस्टवर परत जाणार आहे.

‘चीन विरुद्ध मोठ्या संघर्षाची शक्यता’, जशास तसे उत्तर देण्याचा रावत यांचा इशारा

तर तिसऱ्या टप्प्यात पॅँगोंग लेकच्या दक्षिण भागातून सैनिक हटविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चुशूल, रेजांग या भागातल्या ज्या टेकड्यांवर ताबा मिळविण्यात आला होता त्या टेकड्याही खाली करण्यात येणार आहेत.

या सगळ्या कामांवर दोन्ही देशांचे सैनिक संयुक्त पद्धतीने लक्ष ठेवणार आहेत. सध्या या भागात प्रचंड बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. तापमान हे शुन्याच्या खाली 40 ते 45 डिग्रीपर्यंत जातं. त्यामुळे अशा हाडे गोठविणाऱ्या थंडीच्या आधीच सैन्य पूर्वीच्या जागी जाणार आहे.

रशियन रणगाडे खरेदी करणार भारत; तर चीन घेणार चॉपर ड्रोन! युद्धाची तयारी तर नाही?

काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चिनी लष्कराचंही मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर दोन्ही देशांकडून सीमेवर मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 11, 2020, 3:43 PM IST

ताज्या बातम्या