Home /News /national /

भारताच्या दणक्याने घाबरला चीन, गलवान नंतर आता ‘या’ भागातूनही हटवलं सैन्य

भारताच्या दणक्याने घाबरला चीन, गलवान नंतर आता ‘या’ भागातूनही हटवलं सैन्य

भारत कुठल्याही दबावाला आणि धमक्यांना घाबरणारा नाही आणि बळीही पडणार नाही असं भारतीय अधिकाऱ्यांनी चीनला स्पष्टपणे सुनावलं होतं.

    नवी दिल्ली 8 जुलै: लद्दाखच्या पूर्व (Ladakh) भागात चीन आणि भारतादरम्यान (India-China Border Tension) गेल्या दोन महिन्यांपासून तणाव आहे. आता हा तणाव निवळतांना दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लेह-लडाखचा दौरा केला होता. त्याचबरोबर जखमी सैनिकांची भेटही घेतली होती. त्यामुळे चीनला कडक संदेश गेल्याचं मानलं जात आहे. त्याच बरोबर भारताने या भागात युद्ध सरावाला सुरूवातही केली होती. भारताच्या या आक्रमक रणनीतीचा परिणाम दिसून येत आहे. या दणक्यानंतरच चीनने गलवान नंतर आता हॉट स्प्रिंग (Hot-springs) भागातूनही आपलं सैन्य माघारी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लडाख जवळच्या हॉट स्प्रिंगमधल्या पाईंट 15 इथून भारत आणि चीनचे सैनिक 2 किलोमीटर मागे फिरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बोलणी सुरू होती. त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी सैनिक मागे घ्या अशी सूचना भारताने केली होती. भारत कुठल्याही दबावाला आणि धमक्यांना घाबरणारा नाही आणि बळीही पडणार नाही असं भारतीय अधिकाऱ्यांनी चीनला स्पष्टपणे सुनावलं होतं. त्यामुळे तणाव वाढणार असं दिसताच चीनने आपलं सैन्य मागे बोलविण्याचा निर्णय घेतला. पेंगाँग लेकच्या काही भागात अजुनही चिनी सैनिकांच्या हालचाली दिसून येत आहेत. या भागातले तंबू आणि गाड्या चीनने हटवल्या मात्र काही हालचाली आढळल्या आहेत. भारतीय अधिकारीही चिनी सैन्याची प्रत्येक हालचाल टिपत असून कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास लष्कर सज्ज असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. चीन सीमेवर हवाई दलाचे रात्रीच्या अंधारात खास ऑपरेशन, हेलिकॉप्टर कारवाईचा VIDEO जूनमध्येच चीनने भारतातील गलवान खोऱ्यात सार्वभौमत्वाचा दावा करण्यास सुरुवात केली होती. ज्यामध्ये त्यांनी 1962 नंतर कधी दावा केला नव्हता. चीनच्या या दाव्यांवर विदेश मंत्रालयाला 17-18 जूनच्या मध्य रात्री 12.45 वाजता खंडन जारी करण्यासाठी प्रवृत्त केलं. ज्यामध्ये प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी चीनच्या दाव्यांना अतिशयोक्ती आणि अमान्य म्हणत फेटाळले. नरेंद्र मोदी सरकार चीनला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत, घेणार हा मोठा निर्णय यानंतर भारताने चीनच्या गलवान खोऱ्यातील दाव्यावर आणखी तीन खंडन जारी केले. 20 जून रोजी एमईएम यांनी सांगितले की गलवान खोऱ्यातील भागासंबंधित परिस्थिती यापूर्वीच स्पष्ट झाली आहे. चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषाबाबत सुरू असलेले प्रयत्न अतिशयोक्ती आहेत. हे दावे स्वीकाहार्य नाही.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या