Home /News /national /

सिक्कीम-अरुणाचल प्रदेशच्या दिशेन चिनी सैन्य वसवतंय खेडी, डोकलामजवळ लष्करी हालचाली वाढल्या

सिक्कीम-अरुणाचल प्रदेशच्या दिशेन चिनी सैन्य वसवतंय खेडी, डोकलामजवळ लष्करी हालचाली वाढल्या

चीनच्या कुरापाती सुरूच, सिक्कीम-अरुणाचल प्रदेशच्या दिशेन खेडी वसवतय चीन.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : चीन सध्या आपल्या सीमालगत असलेल्या प्रत्येक देशाशी संघर्ष करण्याच्या तयारीत आहे. विस्तारवादी भूमिकेमुळे सतत या देशांना त्रास देण्याचं धोरण चीन राबवतच असतो. डोकलाममधील चीनच्या अतिक्रमणानंतर भारताने कणखर भूमिका घेतली होती. त्यानंतरही चीननं आपल्या कुरापाती सुरूच ठेवल्या आहेत. डोकलाम भागात प्रत्यक्ष ताबा रेषेपाशी (LAC) सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाच्या दिशेने चीनने नवीन खेडी वसवायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये दूरवर राहणाऱ्या नागरिकांना सीमेजवळ आणून वसवायचं आणि हळूहळू तिथं लष्करासाठी पायाभूत सुविधा उभ्या करायच्या असा चीनचा डाव असल्याची माहिती भारतीय लष्करातील सूत्रांनी दिली. गुप्तचर खात्यानी दिलेल्या माहितीनुसार असंच एक गाव डोकलाममध्ये दिसलंय जिथं लष्कराच्या साठवणुकीची व्यवस्थाही दिसून येत आहे. नव्याने बांधलेले बंकर दिसत आहेत त्यामुळे डोकलाम भागात मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करण्याची तयारी सुरू आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. LAC जवळ अशाच पद्धतीच्या अनेक छावण्या दिसत असून त्यापैकी बहुतांश सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशकडे तोंड करून उभारल्या आहेत. त्यामुळे भारताला आणखी सावध होण्याची गरज आहे. भारतीय लष्करही या भागातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. वाचा-भारत-चीन संघर्षादरम्यान LAC वर लडाखच्या नागरिकांची सैन्याला मोठी मदत दुहेरी पद्धतीने करणार खेड्यांचा वापर सीमाभागात चीन उभारत असलेल्या खेड्यांचा वापर दुहेरी पद्धतीने करण्याचा विचार आहे. एकतर त्या भागात नागरी वस्ती वाढवणं हा उद्देश आणि दुसरा उद्देश म्हणजे त्या वस्तीचा लष्करी कामांसाठी वापर करणं. यापैकी काही खेड्यांमध्ये नागरी वस्ती नसून ती केवळ पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांसाठी अतिरिक्त पायाभूत सुविधा म्हणून उभारली आहेत. कामेंगच्या विरुद्ध दिशेला असलेल्या बुमड्रोपर्यंत या वस्त्या आल्या आहेत. डोमोनग्राँगच्या जवळ असणाऱ्या बुमड्रोमध्ये सहा ते सात पक्क्या झोपड्या दिसत असून मेरा ला, थाग ला आणि यांगत्से परिसरात टेहाळणी करणाऱ्या पीएलएच्या सैनिकांना राहण्यासाठी त्या बांधल्या आहेत. वाचा-लडाख: लष्कराची जय्यत तयारी, जवानांची घरं पाहून चीनलाही फुटेल घाम; पाहा PHOTOS दोन मोबाइल टॉवर उभारण्यात आले चीनने त्रिकांग ते शियुंग लादरम्यान रस्ता तयार केला आहे. त्रिकांग गावातील पर्वतावरून नैऋत्य दिशेला शियुंग लाच्या दिशेने हा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्रिकांग गावात दोन मोबाइल टॉवर उभारण्यात आले आहेत. चीनने उभारलेल्या छावण्यांचे सॅटेलाइटमधून घेतलेले फोटो पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत. या गावांत टेहळणी टॉवरही उभारलेले आहेत. या नव्याने उभारलेल्या गावांपैकी काही चीनने तयार केलेल्या चौपदरी रस्त्यांनाही जोडलेली आहेत. LAC जवळील काही भाग खुला करण्याचं धोरण भारतानेही स्वीकारलं आहे. LAC बद्दल भारत-चीनदरम्यान सात महिने तणावाचं वातावरण होतं. विविध पातळ्यांवर चर्चा झाल्यानंतरही त्यावर तोडगा निघालेला नाही आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: India china

    पुढील बातम्या