भीषण! अखेर पुरावा आला समोर; चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारायला वापरले हे खिळ्यांचे रॉड

भीषण! अखेर पुरावा आला समोर; चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारायला वापरले हे खिळ्यांचे रॉड

लडाखच्या पर्वतीय प्रदेशात चिनी सैनिकांनी अत्यंत अमानुषपणे भारतीय सैन्यावर हल्ला केला, हे आता समोर आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : चीन- भारत (India- China conflict) सीमेवर गलवान खोऱ्यात (Galwan Valley)  झालेल्या संघर्षात नेहमीच्या चकमकी होतात, तसा गोळीबार झालाच नव्हता, ही बाब आतापर्यंत समोर आलेली आहे. लडाखच्या पर्वतीय प्रदेशात चिनी सैनिकांनी अत्यंत अमानुषपणे भारतीय सैन्यावर हल्ला केला, हे आता समोर आलं आहे. चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारण्यासाठी वापरलेल्या अणकुचीदार  खिळे लावलेल्या रॉडचा फोटो समोर आला आहे.

भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. चिनी सैनिकांनी दगड आणि खिळे ठोकलेले रॉड यांसह भारतीय सैनिकांवर हल्ला केला. अनेक सैनिक जखमी झाले.  भारतानेही तीव्र प्रतिकार करत चीनचा हल्ला परतवून लावला. चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र चीनच्या बाजूने अद्यापही यावर अधिकृत काही माहिती जाहीर झालेली नाही. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, चिनी कारवायांचा आणखी एक धक्कादायक पुरावा हाती आला आहे.  प्रत्यक्ष ताबारेषेच्या LAC चीनकडच्या हद्दीत बुलडोझर आणून हालचाली सुरू होत्या. त्यांनी काही सॅटेलाइट इमेजचा हवाला देऊन वृत्त दिलं आहे की, गलवान नदीचा प्रवाह बदलायचे चिनी सैनिकांचे प्रयत्न सुरू आहेत.

सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ सैन्य मागे घेण्यासंबंधी संवाद आणि हालचाल सुरू असतानाच हा अनपेक्षित हल्ला करण्यात आला. हा चीनने केलेला पूर्वनियोजित हल्ला असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं आहे. यामध्ये गोळीबार नाही तर तुफान दगडफेक आणि रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली. पर्वतीय प्रदेशात अनेक सैनिकांचा कड्यावरून पडून मृत्यू झाला. जवळपास तीन तास ही धुमश्चक्री सुरू होती.

भारताच्या परराष्ट्र खात्याने दोन देशांच्या लडाखजवळच्या सीमाभागात संघर्ष झाल्याचं निवेदन दिलं होतं. त्यात दोन्ही बाजूंकडचं नुकसान झाल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर भारतीय लष्कराने यात धारातीर्थी पडलेल्या 20 जवानांची नावंसुद्धा जाहीर केली.

First published: June 18, 2020, 7:42 PM IST

ताज्या बातम्या