Home /News /national /

रशियन रणगाडे खरेदी करणार भारत; तर चीन घेणार चॉपर ड्रोन! ही युद्धाची तयारी तर नाही?

रशियन रणगाडे खरेदी करणार भारत; तर चीन घेणार चॉपर ड्रोन! ही युद्धाची तयारी तर नाही?

भारत आणि चीन सीमेवर (India China border) लडाख प्रांतात दोन्ही देशांत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

    नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : भारत आणि चीन सीमेवर (India China border) लडाख प्रांतात दोन्ही देशांत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गलवान खोऱ्यात (Ladakh Border) संघर्षानंतर दोन देशांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप निवळलेला नाही. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य पूर्ण तयारीत असून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) VT-4 प्रकारातील हलके रणगाडे सीमेवर तैनात केले आहेत. तर दुसरीकडे भारत रशियाच्या (Russian Made Light Tank) वजनाने हलक्या स्प्रूत एसडी या रणगाड्यांवर अवलंबून आहे. चीनच्या सैन्याने मानवरहित चॉपर ड्रोन (Chopper Drone) आणि अन्य हत्यारांची खरेदी केली आहे. त्यामुळे भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास दोन्ही देश कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्यास तयार नाही. भारताने बॉर्डरवर हलके रणगाडे तैनात करण्याची योजना तयार केली आहे. यासाठी DRDO ने हिरवा झेंडा दाखवला असून यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत रशियाकडून रणगाडे खरेदी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे या रणगाड्यांची भारताला गरज का आहे चीनची तयारी काय आहे यासंबंधी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. का खास आहेत Sprut-SD रणगाडे या रणगाड्याची खासियत म्हणजे वजनाने हलका तरीदेखील शत्रूची मोठी मोठी शस्त्रे देखील नष्ट करू शकतो. या रणगाड्याला 125 एमएमची बंदूक लावण्यात आली आहे. याची मारक क्षमता ही T-72, T-90 बरोबरच नवीन आलेल्या T-14 सारखीच आहे. पाण्यातील आणि जमिनीवरील रणगाडे देखील नष्ट करण्याची क्षमता यामध्ये आहे. सोवियत रशियाच्या कालखंडातील हे रणगाडे असून त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून रशियाच्या सैन्यामधील काही युनिटमध्ये वापरण्यात येत आहेत. या रणगाड्याचे वजन 18 टन असून चीनच्या VT-5 रणगाड्याच्या तुलनेत अर्धेच वजन आहे. वजनाने हलके असला तरीदेखील सर्वाधिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता त्यामध्ये आहे. भारताच्या अजेय T-72 आणि T-90 या रणगाड्यांबरोबर याची चांगली जुगलबंदी होऊ शकते. तिन्ही रणगाडे मिळून भारताला उत्तम सुरक्षा प्रदान करू शकतात. त्याचबरोब या स्प्रूत रणगाड्यामध्ये असलेल्या बंदुकीमध्ये असलेल्या ऑटोलोडरमुळे याला महत्त्व प्राप्त होते. प्रति मिनिट 6 ते 8 राउंड यामधून फायर केले जाऊ शकतात. भारत रशियाकडून या रणगाड्यांची मागणी करणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे तर दुसरीकडे चीन देखील पूर्ण तयारीत आहे. भारताच्या सीमेवर चीनच्या कुरापती चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्या सैनिकांसाठी खास ग्राफिनपासून बनवलेले कपडे तयार केले आहेत. कार्बन पासून तयार केले जाणारे ग्राफिन कापडाचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाला नोबेल पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचबरोबर चीन सध्या मोठ्या प्रमाणात हत्यारांची खरेदी करत आहे. यामध्ये महत्त्वाचं हत्यार म्हणजे चॉपर ड्रोन. दक्षिण चीनमधल्या काही कंपन्या ड्रोन तयार करण्यात पटाईत आहेत. मानवविरहित उडू शकणाऱ्या आणि लँड होणाऱ्या ड्रोनची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. चीनच्या सैनिकांच्या तिबेटमधील कमांडने २२ खासगी हत्यार निर्मिती कंपन्यांबरोबर मिटिंग करून काही हत्यारांची पाहणी केली आहे. त्यामुळे खास भारताच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी ही खरेदी केली जात आहे.
    First published:

    Tags: India china

    पुढील बातम्या