Home /News /national /

भारत-चीन सीमावादासोबतच मोदी सरकारसमोर 'ही' आहेत 5 मोठी आव्हानं

भारत-चीन सीमावादासोबतच मोदी सरकारसमोर 'ही' आहेत 5 मोठी आव्हानं

भारताची चिंता ही फक्त चीनबरोबरचा तणाव नाही, असणारी आणखीनं 5 आव्हानं आहेत.

    नवी दिल्ली, 17 जून : भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणाव वाढत आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचार 20 जवान शहीद झाले आहेत. नवी दिल्लीपासून बीजिंगपर्यंत बैठका घेऊन चर्चेतून हा तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण भारताची चिंता ही फक्त चीनबरोबरचा तणाव नाही, असणारी आणखीनं 5 आव्हानं आहेत. चीनकडून येणारा ताण आता शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे कोरोनाचं थैमान सुरू आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला नेपाळच्या सीमेवर वाद सुरू आहे. दुसरीकडे सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुरघोड्याही सातत्यानं सुरू आहे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे डोकेदुखीही वाढत आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार या आव्हानांना एकत्र कसं सामोरं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. चीन आणि भारत यांच्यातील लडाखच्या सीमेवरील वाद भारत-चीन (india-china) यांच्यात तब्बल 45 वर्षांनी एवढा मोठा संघर्ष झालेला पाहायला मिळाला. गलवान खोऱ्यात (galwan valley) सुरू झालेला हा सीमा वाद आता दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडवू शकतो. भारत- चीन सीमेवर सोमवारी रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा आणि बैठकांमधून हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे वाचा-भारत-चीन संघर्षावर अशी होती आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांची प्रतिक्रिया पाकिस्तांनकडून सुरू असणाऱ्या सतत्यानं कुरापती पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि इतर कुरापतीही सुरूच असतात. त्यामुळे वर्षाचे 12 महिनेही सैनिकांना सीमेच्या रक्षणासाठी पाकिस्तानशी अघोषित युद्ध लढावे लागत आहे. कोरोनाचं थैमान आणि संसर्ग रोखण्याचं आव्हान देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 974 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 2003 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 86 हजार 935 झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 11 हजार 903 झाला आहे. यासह भारताचा मृत्यूदर 2.9% वरून 3.4 झाला आहे. हे वाचा-India-China Rift:500 चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याचा CAITचा निर्णय,वाचा यादी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर आलेलं संकट लॉकडाऊनमुळे भारतातील अनेक छोटे उद्योगधंदे बंद झाले तर मोठ्या कंपन्यांमध्येही कर्मचारी कपात आणि त्याचे परिणाम दिसून आले आहेत. कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची झालेली घसरण भरून काढण्याचं मोठं आव्हान मोदी सरकार समोर असणार आहे. हे वाचा-'त्या' 3 तासात नेमकं काय घडलं, गलवान खोऱ्यातील INSIDE STORY हे वाचा-देशातील मृतांचा आकडा 12 हजारांच्या घरात, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Nepal, PM narendra modi

    पुढील बातम्या