मराठी बातम्या /बातम्या /देश /

वायकॉम 18 आणि टीव्ही 18 चॅनेलची पायरसी करणाऱ्या ऑपरेटर्सविरोधात इंडियाकास्टची कायदेशीर कारवाई, राजस्थानमधून अटक केलेल्या चौघांना न्यायालयीन कोठडी

वायकॉम 18 आणि टीव्ही 18 चॅनेलची पायरसी करणाऱ्या ऑपरेटर्सविरोधात इंडियाकास्टची कायदेशीर कारवाई, राजस्थानमधून अटक केलेल्या चौघांना न्यायालयीन कोठडी

 भिवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी चौघांना अटक केली असून न्यायलयाने त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

भिवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी चौघांना अटक केली असून न्यायलयाने त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

भिवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी चौघांना अटक केली असून न्यायलयाने त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

नवी दिल्ली, 09 सप्टेंबर: अलीकडच्या काळात पायरसीचं (Piracy) प्रमाण वाढलं असून, ओटीटी (OTT), टीव्ही चॅनेल्सवरील (TV Channels) कंटेंट (Content) बेकायदेशीरपणे कॉपी करून प्रसारित करण्याचे प्रकार सर्रास होत असल्याचे उघडकीस येत आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया कास्टने (India Cast) आपली पायरसीविरोधी काम करणारी एजन्सी कामाख्याच्या (Kamakhya Agency) माध्यमातून राजस्थानमधील (Rajasthan) भिवाडी इथल्या नारनौल केबल सर्व्हिसेस आणि फौलाद केबलच्या मालकांविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये चार तक्रारी (First Information Reports) दाखल केल्या आहेत. भिवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी चौघांना अटक केली असून न्यायलयाने त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ‘थोप टीव्ही’ च्या माध्यमातून अनधिकृतपणे ऑनलाईन ब्रॉडकास्ट आणि ओटीटी कंटेट दाखवला जात होता. त्यावरही महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करून थोप टीव्हीच्या संस्थापक, सीईओला अटक केली आहे.

इंडियाकास्ट ही टीव्ही 18 ब्रॉडकास्ट लिमिटेड (TV18 Broadcast Ltd) आणि वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Viacom18 Media Pvt Ltd) यांची संयुक्त मालकी असलेली मल्टी-प्लॅटफॉर्म कंटेंट अॅसेट मोनेटायझेशन संस्था असून, तिनं पायरसीच्या घातक समस्येविरूद्ध आक्रमक मोहीम सुरू केली आहे. इंडियाकास्ट वितरण, प्लेसमेंट सेवा, ग्लोबल चॅनेल डिस्ट्रीब्युशन आणि जाहिरात, डिजिटल मीडिया डिस्ट्रीब्युशन आणि समूहातील सर्व कंपन्या आणि चॅनेल्ससाठीच्या कंटेंट सिंडिकेशन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.

राजस्थानमधील भिवाडी (Bhiwadi) या भागात हे केबल टीव्ही ऑपरेटर्स टीव्ही 18 आणि वायकॉम 18 चॅनेलचं बेकायदेशीर आणि अनधिकृत प्रसारण करत असल्याचं उघडकीस आल्यानं त्यांच्याविरुद्ध कॉपीराइट कायदा 1957 आणि भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

400 हून अधिक लोकांची चौकशी, 150 CCTV कॅमेऱ्यांचा तपास; आईच्या हत्येचा आरोपी निघला मुलगा

भिवाडी पोलिसांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत, वेगवेगळ्या ठिकाणी सहापेक्षा जास्त छापे टाकले. विविध वाहिन्यांचे सिग्नल प्रसारित करण्यासाठी वापरले जाणारे ट्रान्समीटर आणि नोड्ससारखी उपकरणं जप्त केली. तसंच या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा जामीनही नाकारण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, इंडियाकास्टचे प्रवक्ते (India Cast Spokesperson) म्हणाले, ‘पायरसीचा मुकाबला करण्याच्या या प्रयत्नात भिवाडीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित आणि वेळेवर हस्तक्षेप केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पायरेटेड कंटेंट ही संपूर्ण मीडियासाठी वाढती चिंता आहे कारण ती थेट ब्रॉडकास्टरच्या उत्पन्नावरच परिणाम करते. त्याचप्रमाणे कंटेंट निर्मितीसाठी अनेक लोकांनी घेतलेले कष्टही यामुळे कवडीमोल ठरतात. वायकॉम 18 आणि टीव्ही 18 नेटवर्कसह इंडियाकास्ट पायरसीचा मुकाबला करत राहील आणि सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करून या चॅनेल्सच्या मौल्यवान कंटेंटचं संरक्षण करेल.’

Watch Video: जालौरच्या हायवेवर सुखोई- जग्वारचं लँडिंग; राजनाथ सिंह, नितीन गडकरींची उपस्थिती

टीव्ही 18 ब्रॉडकास्ट आणि वायकॉम 18 नेहमीच पायरसी रोखण्यासाठी आघाडीवर असतात. पायरसीला आळा घालण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनाच एक भाग म्हणून अलीकडेच, वायकॉम 18ने महाराष्ट्र राज्यातील पोलिसांच्या सायबर सेलमध्ये ‘थोप टीव्ही’विरोधात (THOP TV) तक्रार केली होती. या टीव्हीवर लाखो ऑनलाइन दर्शकांना पायरेटेड ब्रॉडकास्ट आणि ओटीटी कंटेंट सवलतीच्या दरात उपलब्ध केल्याचा आरोप कंपनीनं केला आहे. यामुळे टीव्ही 18 नेटवर्कच्या उत्पन्नाला मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्र सायबर सेलने (Maharashtra Cyber Cell) या एफआयआरवर कारवाई करून थोप (THOP) टीव्हीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अटक केली.

इंडियाकास्ट ही टीव्ही 18 ब्रॉडकास्ट लिमिटेड (TV18 Broadcast Ltd) आणि वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Viacom18 Media Pvt Ltd) यांची संयुक्त मालकी असलेली मल्टी-प्लॅटफॉर्म कंटेंट अॅसेट मोनेटायझेशन संस्था असून, अशाप्रकारची देशातील पहिली कंपनी आहे. इंडियाकास्ट भारतात वितरण, प्लेसमेंट सेवा, ग्लोबल चॅनेल डिस्ट्रीब्युशन आणि जाहिरात, डिजिटल मीडिया डिस्ट्रीब्युशन आणि समूहातील सर्व कंपन्या आणि चॅनेल्ससाठीच्या कंटेंट सिंडिकेशनमध्ये कार्यरत आहे. इंडियाकास्ट भारतात मुलांसाठी, मोठ्यांसाठी मनोरंजन, बातम्या, संगीत, चित्रपट आणि इन्फोटेनमेंट अशा विविध प्रकारातील चॅनेल्सचे वितरण करते. यामध्ये 15पेक्षा अधिक एचडी चॅनेल्ससह एकूण 61 चॅनेल्सचा समावेश आहे.

राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, महाराष्ट्रासह पाच राज्यांतील रिक्त जागांवर निवडणूक

आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील इंडियाकास्टकडे 10पेक्षा जास्त चॅनेल्सचा पोर्टफोलिओ आहे. 80 पेक्षा जास्त देशांमध्ये ही चॅनेल्स पाहिली जातात. 15 हजार तासांपेक्षा अधिक कालावधीतील समृद्ध कंटेंटचा साठा असणारी इंडियाकास्ट सुमारे 100 देशांमध्ये 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये कंटेंट सिंडिकेट करते.

First published:

Tags: Rajsthan