अग्नि-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, काय आहेत 'या' मिसाईलची वैशिष्ट्यं?

अग्नि-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, काय आहेत 'या' मिसाईलची वैशिष्ट्यं?

2 हजार किमीपर्यंत अचूक लक्ष्य भेदणाऱ्या अग्नि-2 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

  • Share this:

बालासोर, 17 नोव्हेंबर: शत्रूंच्या काळजात धडकी भरवणाऱ्या अस्त्र आता भारताच्या ताफ्यात सामिल होत असल्यानं भारताची ताकद वाढली आहे. अग्नि-2 या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी करण्यात भारताला यश आलं. भारताने 2 हजार किलोमीटरपर्यंत हल्ला अचून नेम धरून हल्ला करू शकणाऱ्या अग्नि-2 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी केली. स्ट्रैटेजिक फोर्सेज कमांड द्वारे ओडिशातील बालासोर इथे रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच ही चाचणी घेण्यात आली.

अग्नि-2 या क्षेपणास्त्राची काय आहेत वैशिष्ट्यं

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. हे साधारण 2000 किलोमीटरपर्यंत अचून नेम साधून मारा करण्याची त्याची क्षमता आहे. त्याची क्षमता 2 हजार किलोमीटरपर्यंत वाढवताही येऊ शकते.

अग्नि-2 क्षेपणास्त्राची लांबी साधारण 20 मीटर एवढी आहे आणि या क्षेपणास्त्रासोबत अण्वस्त्रं आणि एक टनापर्यंत न्यूक्लियर वॉरहेड बाळगण्याची क्षमता आहे.

अग्नि-2 क्षेपणास्त्राचा भारतीय सैन्यात या आधीच समावेश करण्यात आला आहे.

Loading...

उच्च आणि अचून लक्ष्य भेदण्यासाठी या मिसाईलमध्ये उत्तम दर्जाची नॅव्हिगेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्यामुळे 2 हजार किमीपर्यंत हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष साधते.

हे क्षेपणास्त्र इंधानाद्वारे चालवण्यात येईल. त्यासोबतच डीआरडीओच्या प्रगत सिस्टीम प्रयोगशाळेत या क्षेपणास्त्राला तयार अत्याधुनिक सुविधा वापरून तयार करण्यात आलं आहे.

हे क्षेपणास्त्र 1 हजार किलो पेलोड घेऊन जाण्यासाठी सक्षम आहे. दोन टप्प्यात आपलं लक्ष्य गाठणारं हे क्षेपणास्त्र घन इंधनावर चालतं.

या क्षेपणास्त्राची नियमीत चाचणी असल्याचं स्पष्ट केलं जात आहे. मात्र रात्रीच्या वेळी प्रथमच या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आणि त्या चाचणीमध्ये पहिल्याच टप्प्यात यशस्वी चाचणी करण्यात भारताला यश आल्यानं आता भारताच्या ताफ्यात आणखी एका क्षेपणास्त्र आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2019 08:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...