VIDEO 'श्रीलंकेतल्या स्फोटानंतर भारतालाही काळजी घेण्याची गरज'

VIDEO 'श्रीलंकेतल्या स्फोटानंतर भारतालाही काळजी घेण्याची गरज'

'गेली पाच वर्ष काश्मीरातल्या घटना वगळल्या तर इतर भागात दहशतवादाच्या घटना घडल्या नाहीत ही समाधानाची बाब.'

  • Share this:

नवी दिल्ली 24 एप्रिल : श्रीलंकेतल्या साखळी बॉम्ब स्फोटानंतर भारतालाही अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचं मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. भारताचा अतिशय जवळचा शेजारी असलेल्या श्रीलंकेतल्या रविवारच्या स्फोटाने सर्व जग हादरुन गेलंय. कट्टरतावादी तरुणांची वाढती संख्या आणि त्यांना विदेशातून मिळणारी मदत यामुळे जगभरच परिस्थिती गंभीर झाली असल्याचं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

गेली पाच वर्ष काश्मीरातल्या घटना वगळल्या तर इतर भागात  दहशतवादाच्या घटना घडल्या नाहीत ही समाधानाची बाब असली तरी निष्काळजी राहून चालणार नाही असं मत संरक्षण तज्ज्ञ ए. के. सीवाच यांनी व्यक्त केलं. दहशतवाद ही सर्व जगापुढचीच मोठी समस्या आहे. त्याचा मुकाबला करायचा असेल तर कायम सावध राहण्याची गरज आहे असं मतही त्यांनी व्यक्त केल.

श्रीलंकेतल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतालाही धोका निर्माण झालाय. हा धोका टाळायचा असेल तर कायम सावध राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले. रविवारी ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या विविध आठ आत्मघातकी बॉम्ब स्फोटांमध्ये 359 जणांचा मृत्या झाला होता. त्यात 34 विदेशी नागरिक होते. तर 500 जण जखमी झाले आहेत. श्रीलंका पोलिसांचं एक विशेष पथक या स्फोटांची चौकशी करत आहे.

दहशतवादी कोट्यधीश

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांनी सर्व जग हादरून गेलं आहे. या स्फोटाचा तपास एक खास टीम करत असून त्यात अनेक धक्कादाक गोष्टी बाहेर येत आहेत. कोलंबोतल्या ज्या दोन अलिशान हॉटेलमध्ये स्फोट झाले ते स्फोट दोन भावांनी घडवले असून ते श्रीलंकेतल्या एका मोठ्या कोट्यशीध व्यापाऱ्यांची मुलं असल्याचं वृत्त AFPने दिलं आहे. एका आरोपीच्या बायकोने स्वत:सह आपल्या दोन लहान मुलांनाही बॉम्ब स्फोटाने उडवून दिलं होतं अशी धक्कादायक माहितीही सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

मसाल्याचे व्यापारी

राजधानी कोलंबोतल्या ज्या दोन अलिशान हॉटेल्समध्ये जे स्फोट झाले ते दोन भावांनी घडवून आणले होते. 18 ते 20 अशा वयांचे ते होते. त्या दोन भावांची नावं पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. त्यांच्या वडिलांचा मसाल्याचा मोठा व्यापार असून ते श्रीलंकेतल्या श्रीमंत घराण्यांपैकी एक आहेत. हे दोनही बंधू उच्च शिक्षित होते अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

चिन्नामोन ग्रँड आणि शांग्रीला या दोन हॉटेलमध्ये या भावांनी खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. त्यापैकी एका भावाने खोट्या नावाने खोली बुक केली होती तर एका भावाने खरं नाव आणि पत्ता लिहीला होता. हे दोघही आत्मघाती हल्लेखोर होते. एकाने हॉटेलच्या जेवणाच्या लॉबित जाऊन तर दुसऱ्या भावाने रेस्टॉरंटमध्ये स्फोट घडवून आणले. त्यांनी आपल्या पाठिवरच्या सॅकमध्ये शक्तिशाली स्फोटके दडवून ठेवली होती.

आत्मघाती कुटुंब

या आरोपींच्या घराचा माग काढत पोलीस जेव्हा त्यांच्या घरी पोहचले तेव्हा त्यांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. एका आरोपीच्या बायकोने स्वत:सह आपल्या दोन लहान मुलांनाही बॉम्ब स्फोटाने उडवून दिलं होतं असंही स्पष्ट झालं आहे.

या कुटुंबातच दहशतवाद्यांचं एक युनिट होतं असा दावा पोलिसांनी केलाय. हे कुटुंब कट्टरतावादाकडे का वळलं याचा तपास पोलीस करत आहेत. नॅशनल तौहीद जमात या स्थानिक दहशतवादी संघटनेसोबत यांचे संबंध होते का याचाही तपास सुरू आहे. इस्लामिक स्टेट ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून सुरक्षा दलं त्यादृष्टीनेही तपास करत आहेत.

First published: April 24, 2019, 11:11 PM IST
Tags: sri lanka

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading