भारतानं अंतराळात असा केला होता एअर स्ट्राईक, पाहा 'मिशन शक्ती'चा VIDEO

भारतानं अंतराळात असा केला होता एअर स्ट्राईक, पाहा 'मिशन शक्ती'चा VIDEO

मिशन शक्तीच्या चाचणीपूर्वीपासून ते अंतराळात उपग्रह पाडण्यापर्यंतची माहिती या व्हिडीओद्वारे देण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : अंतराळातील 'मिशन शक्ती' नावानं घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'मिशन शक्ती' अंतर्गत भारतानं ओडिशाच्या बालासोर किनारपट्टीजवळील एपीजे अब्दुल कलाम बेटावरील प्रक्षेपण तळावरून क्षेपणास्त्राद्वारे अंतराळातील एक उपग्रह पाडला होता. मिशन शक्ती यशस्वी झाल्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. देशाच्या मिशन शक्तीच्या यशाची माहिती देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 27 मार्च रोजी संवाद साधला होता.

याच मिशन शक्तीबाबत सर्व घडामोडींसंदर्भातील माहिती देणारा एक व्हिडीओ सरकारतर्फे शनिवारी (6 एप्रिल) फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.  चाचणीपूर्वीपासून ते अंतराळात उपग्रह पाडण्यापर्यंतची माहिती या व्हिडीओद्वारे देण्यात आली आहे. पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावरच्या कक्षेत भ्रमण करणारा आणि टार्गेट करण्यात आलेल्या उपग्रहाचा क्षेपणास्त्रानं अचूक वेध घेत ते केवळ तीन मिनिटांमध्ये नष्ट केलं होतं.

या व्हिडीओमध्ये क्षेपणास्त्रासाठी वापरण्यात आलेलं आधुनिक तंत्रज्ञान सविस्तर दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये डीआरडीओला या आव्हानात्मक तंत्रज्ञानावर काम करण्याचे निर्देश दिले होते आणि 2016मध्ये मिशन शक्तीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला होता. यासाठी डीआरडीओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये अनेक बैठकादेखील झाल्या होत्या. या मिशनवर देशभरातील जवळपास 150 शास्त्रज्ञ काम करत होते. पंतप्रधान मोदींनी या मिशनबाबत देशवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केलं होतं,'मिशन शक्तीची करण्यात आलेली चाचणी कोणत्याही देशाविरोधात केलेली नाही.'

वाचा अन्य बातम्या

निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई, 'आयटी'कडून 30 तासांपासून धाडसत्र सुरूच

'जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा', शरद पवारांनी घातली साद

'पुन्हा हल्ल्याचं विधान बेजबाबदारपणाचं', भारतानं फेटाळला पाकचा दावा

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

First published: April 8, 2019, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading