पाकिस्तानातील शेअर बाजारात हाहाकार! अवघ्या काही मिनिटांत बुडाले कोट्यवधी रुपये

पाकिस्तानातील शेअर बाजारात हाहाकार! अवघ्या काही मिनिटांत बुडाले कोट्यवधी रुपये

तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे भारतासोबत युद्ध केल्यास गुंतवणूकदार घाबरून जाऊ शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०१९- पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करत ३०० हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनात पाठवले. या संपूर्ण कारवाईनंतर घाबरलेल्या गुंतवणुकदारांनी पाकिस्तानात गुंतवलेला पैसा काढायला सुरुवात केली. बुधवारी पाकिस्तानच्या शेअर बाजारात अक्षरशः हाहाकार उडाला. कराची स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क इंडेक्स केएसई- १०० अवघ्या काही मिनिटांत १ हजार अंकांनी खाली घसरला. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे भारतासोबत युद्ध केल्यास गुंतवणूकदार घाबरून जाऊ शकतात. यामुळे शेअर बाजार पूर्ण ढासळला. कराचीचा शेअर बाजार एकावेळी १५०० अंकांनी घसरला होता. गेल्या दोन दिवसांमध्ये बाजर २००० अंकांनी कमी आला आहे. १४ फेब्रुवारीपासून ते आजपर्यंत ६ टक्क्यांचं नुकसान झालं आहे.

आता पुढे काय- एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी न्यूज१८ हिंदीला सांगितलं की, सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था फार नाजूक आहे जर स्थिती अजून बिघडली तर कराचीच्या शेअर बाजारात अजून घसरण होऊ शकते. या परिस्थितीत भारतीय शेअर बाजारावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, काल मंगळवारीही कराची स्टॉक एक्सचेंज 364 अंकांनी कोसळला. कराची शेअर बाजारात घसरण आली आणि 39,242.80 अंकावर आला. याउलट भारतीय शेअर बाजारात मात्र तेजी आली आहे. सकाळी बाजार उघडण्याच्या सुमारासच भारताने पाकिस्तानी हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकची बातमी आली. त्याचा शेअर बाजारावर थेट परिणाम लगेच दिसला नाही. सुरुवातीला भारतीय शेअर बाजार काही अंकांनी घसरल्यानंतर काही तासातच सावरला आणि उसळीसुद्धा घेतली. भारताच्या एअर स्ट्राईकच्या बातम्यांना दुजोरा मिळाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली तर पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला.

भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळावरील EXCLUSIVE VIDEO

First published: February 27, 2019, 2:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading