इस्लामाबाद, 25 फेब्रुवारी : वेळोवळी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी आता चिंता व्यक्त करत पाकिस्तानवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. पाकिस्ताननं भारतावर एक अणुबॉम्ब टाकला तर, भारत आपल्यावर 20 अणुबॉम्ब टाकेल आणि आपल्याला नष्ट करेल. त्यामुळे आपण भारतावर 50 अणुबॉम्ब टाकले पाहिजेत. जेणेकरून भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची संधीच राहणार नाही. या हल्ल्यामुळे भारत संपून जाईल. त्यामुळे तुम्ही 50 अणुबॉम्ब हल्ल्यासाठी तयार आहात का? असा सवाल परवेज मुशर्रफ यांनी केला आहे. पाकिस्तानातील 'डॉन' या वृत्त पत्रानं याबाबतची बातमी दिली आहे.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पाकिस्ताननं आपल्या लष्कराला देखील युद्ध सज्जतेचे आदेश दिले आहे. एलओसी जवळच्या 127 गावांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. शिवाय, यापूर्वी पाकिस्ताननं देखील भारताला जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती.
पण, आता मात्र पाकिस्ताननं एक पाऊल मागे येत शांततेसाठी एक संधी मागितली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर बोलताना परवेज मुशर्रफ यांनी देखील भारताला धमकीवजा इशारा दिला होता. पण, आता याच परवेज मुर्शरफ यांनी चिंता व्यक्त करत पाकिस्तानलाच सवाल केले आहेत.
Pulwama : भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर, इम्रानने मागितली 'ही' संधी
इम्रान खाननं मागितली माफी
भारताला 'जशास तसे' उत्तर देण्याची भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अखेर जमिनीवर आले आहेत. भारतानं शांततेची एक संधी द्यावी असं आवाहन इम्रान खान यांनी केलं आहे. शिवाय, भारतानं ठोस पुरावे दिल्यास दहशतवाद्यांविरोधात कारवाई करू असं देखील इम्रान खान यांनी म्हटलं आहे. टोंक येथे झालेल्या भाषणामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. शिवाय, इम्रान खान तुम्ही दिलेलं वचन कधी पाळणार? असा सवाल देखील नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी आता शांततेसाठी एक संधी मागत पुरावे दिल्यास दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानला तसेच दहशतवाद्यांना इशारा देत याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे. त्याप्रमाणे पावलं उचलण्याकरता भारतानं सुरूवात देखील केली आहे. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्ताननं आता भारताकडे एक संधी मागितली आहे.
VIDEO: 'शहीद जवानांचा राजकीय बळी, अजित डोवालांची चौकशी करा'