भारतीय लष्कर आणि हवाई दलाची संयुक्त पत्रकार परिषद

भारतीय लष्कर आणि हवाई दलाची संयुक्त पत्रकार परिषद

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना ही पत्रकार परिषद महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारतीय लष्कर आणि हवाई दलाची पत्रकार परिषद होणार आहे. ही संयुक्त पत्रकार परिषद आज संध्याकाळी 5 वाजता दिल्लीत होईल. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना ही पत्रकार परिषद महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला पाकिस्ताननं ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता होत असलेल्या पत्रकार परिषदेत नेमकी काय भूमिका मांडण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान हे भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. 'भारतीय वैमानिकाची सुटका करण्याबाबत भारतासोबत खुल्या दिलानं तडजोड करायला तयार आहे,' असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे. याबाबत पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

'भारतीय वैमानिक आमच्याकडे सुरक्षित आहे. पाकिस्तानी लष्कर एक जबाबदार लष्कर असून आम्ही लष्करी संकेतांचा आदर करतो,' असं शाह मेहमूद यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,' असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी याआधी केलं होतं. पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान या वैमानिकाला बुधवारी ताब्यात घेतलं आहे.

VIDEO :अशा प्रकारे भारताने पाडलं पाकचं F16 विमान!

First published: February 28, 2019, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading