Whatsapp वरून सरकारने केली हेरगिरी, देशात खळबळ!

Whatsapp वरून सरकारने केली हेरगिरी, देशात खळबळ!

Whatsapp हॅक करून हेरगिरी झाल्याचे फेसबुकनेही मान्य केलं आहे. इस्त्रायलच्या कंपनीच्या स्पायवेअरच्या मदतीने हेरगिरी केल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉटसअॅपच्या प्रायव्हसीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून जगभरातील देशांमध्ये करण्यात येत असलेल्या हेरगिरीची चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांनी खळबळजनक दावा केला आहे. हँकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांवर नजर ठेवली जात होती. व्हॉटसअॅपवरून नजर ठेवण्याच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, युजर्सचा फोन हॅक करण्यासाठी Facebook Inc's WhatsApp याचा वापर करण्यात आला.

हॅकर्सच्या निशाण्यावर बलाढ्य देशांचे वरिष्ठ अधिकारी होते. यामध्ये अमेरिकेसोबत करार असलेल्या तसेच संघटनेत सहकारी असलेल्या देशांचाही समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी, फेसबुककडून इस्त्रायलची सायबर सुरक्षा कंपनी एनएसओवर हँकिंगचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारही दाखल केली आहे.

हेरगिरी होत असल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार देशातील पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला. त्यानंतर व्हॉटसअॅपवर स्पायवेअरच्या वाढत्या वादात माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 2011 आणि 2013 मध्ये तत्कालिन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि जनरल वीके सिंह यांची हेरगिरीचे प्रकार घडल्याचेही स्पष्ट केले. तसेच आताच्या हेरगिरी प्रकरणी व्हॉटसअॅपकडे उत्तर मागितलं आहे. व्हॉटसअॅपला याचे उत्तर देण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला असल्याचंही रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप, हेरगिरीसाठी मोदी सरकार घेतेय इस्रायलची मदत!

एनएसओ कंपनीवर व्हॉटसअॅप सर्व्हरचा वापर केल्याचा आऱोप आहे. त्याच्या माध्यमातून 29 एप्रिल 2019 ते 10 मे 2019 या कालावधीत 1 हजार 400 युजर्सच्या मोबइल फोनवर मालवेअर अटॅक करण्यात आला. त्यातून हेरगिरी करण्यात आली. यामध्ये 20 देशांमधील पत्रकार, सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

अमेरिका, युएई, बहरीन, मेक्सिको, पाकिस्तान, भारत या देशांमधील लोकांचे फोन हॅक झाले. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं मात्र, नेमकं याच देशांमधील अधिकारी आणि लोकांचे फोन हॅक झाले. त्यांच्यावर पाळत ठेवली गेली हे निश्चितपणे सांगता येत नाही.

भारतातील मानवाधिकार कार्यकर्ता आणि वकील शालिनी गेरा यांनीही आपलं व्हॉटसअॅप हॅक केल्याचं म्हटलं आहे. गेल्या महिन्यात टोरांटो युनिव्हर्सिटीच्या सिटिझन लॅबच्या जॉन स्कॉट रेल्टन यांनी संपर्क केला होता. जॉनने माझ्या फोनबाबतची माहिती दिली. मला त्याची तपासणी करण्यासही सांगितलं असं गेरा यांनी म्हटलं. गेरा या या एल्गार परिषदेच्या प्रकारणात आरोपी असलेल्या सुधा भारद्वाज यांचा बचाव करणाऱ्यांपैकी एक आहेत.

हॅक करण्यात आलेल्या व्हॉटसअॅपच्या युजर्सची संख्या आणखी वाढू शकते. सध्या तरी हे स्पष्ट होऊ शकलं नाही की कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. एनएसओने सांगितलं की, कंपनी त्यांचे स्पायवेअर सरकारी कंपन्यांना विकते. मात्र त्याचा वापर अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते किंवा पत्रकार यांच्याविरुद्ध नव्हे तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी करण्याची परवानगी दिली जाते.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Published by: Suraj Yadav
First published: November 1, 2019, 10:33 AM IST
Tags: whatsapp

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading