भारत अमेरिकेकडून खरेदी करणार 10 बिलियन अमेरिकन डॉलरची शस्त्रं

India - America Relation : भारत अमेरिकेकडून 10 बिलियन अमेरिकन डॉलरची शस्त्र खरेदी करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 01:28 PM IST

भारत अमेरिकेकडून खरेदी करणार 10 बिलियन अमेरिकन डॉलरची शस्त्रं

नवी दिल्ली, 24 जून : देशाच्या सुरक्षेला आता सरकार प्राधान्य देत आहे. त्या दृष्टीनं भारतानं आता महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. भारत सरकार अमेरिकेकडून तब्बल 10 बिलियन अमेरिकी डॉलरची शस्त्र खरेदी करणार आहे. अमिरेकेसोबत खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दौरा देखील करणार आहेत. यासाठी डीएसीची देखील स्थापना करण्यात आली आहे. डीएसीच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंह असणार आहेत. दरम्यान, डीएसीनं कामाला सुरूवात केली असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

खरेदीला सुरूवात

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं शस्त्रास्त्र खरेदीला सुरूवात देखील केली आहे. मागील आठवड्यामध्ये अमेरिकेनं आठ Long Range Petrol Aircraft P – 8च्या खरेदीवर शिक्कामोर्बत देखील केलं. यापूर्वी भारतानं याच श्रेणीतील विमानांची खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अमेरिका भारताकडे Long Range Petrol Aircraft P – 8 सोपवणार आहे.

या श्रेणीतील विमानं ही अद्ययावत अशी आहेत. पाणबुडीला शोधून नष्ट करण्याची क्षमता देखील या विमानांमध्ये आहे. 12 पेक्षा जास्त विमानांची खरेदी करण्यात येणार आहे.

पहिला Air Strike नरेंद्र मोदींनी नाही तर वाजपेयींनी केला होता

Loading...

ड्रोनची देखील खरेदी

भारत 2.5 अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीच्या ड्रोनची देखील खरेदी करणार आहे. भारतीय हवाई दल आणि नौसेनेला ही विमानं सोपवली जाणार आहेत. ड्रोन खरेदीचा प्रस्ताव डीएसीकडे पाठवण्यात आला आहे.

यासोबत भारत अत्याधुनिक असं MH-60 रोमिओ हेलिकॉप्टरची देखील खरेदी करणार आहे. दिल्लीच्य़ा सुरक्षेच्या दृष्टीनं या हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव भारतात

सध्या भारत आणि अमेरिकेमधील संबंध हे तणावाचे आहेत. रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी केल्यानंतर हा तणाव आणखीन वाढला. शिवाय, अण्वस्त्र पाणबुडी देखील भारतानं रशियाकडून 10 वर्षाच्या करारावर घेतली आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढू नये यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॅम्पिओ मंगळवारी भारत दौऱ्यावर येत आहेत.

विदर्भातील नेता बसणार विरोधी पक्षनेतेपदी? या आणि इतर 18 टॉप न्यूज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 01:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...