IT`S CONFIRM जैश ए मोहम्मदचा सर्वात मोठा तळ नेस्तनाबूत, भारताची प्रतिक्रिया

IT`S CONFIRM जैश ए मोहम्मदचा सर्वात मोठा तळ नेस्तनाबूत, भारताची प्रतिक्रिया

पाकिस्तानला भारताने वारंवार सांगितले होते मात्र त्यांनी दहशतवाद्यांना समर्थ देणं सुरूच ठेवलं होतं

  • Share this:

 नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा सर्वात मोठा तळ उध्वस्त केला अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे मोठं नुकसान झाले आहे. जैश कडून दहशतवादी कारावाया सुरूच आहे. भारताच्या संसदेवर हल्ला झाला, नंतरही अनेक हल्ले झाले. जैश ए मोहम्मदचे हजारो जिहादी हल्ल्याच्या तयारीत होते. पाकिस्तानच्या मदतीशीवाय अतिरेकी असे कार्य होऊच शकत नाही.


पाकिस्तानला भारताने वारंवार सांगितले होते मात्र त्यांनी दहशतवाद्यांना समर्थ देणं सुरूच ठेवलं होतं असंही गोखले यांनी सांगितलं. भारताच्या हल्ल्यात दहशतवादी, त्यांचे कमांडर आणि त्यांना प्रशिक्षण देणारे ट्रेनर्स ठार झाले आहेत. जैश चा प्रमुख अझहर मसूद यांचा मेव्हणा युसूफ अझहर उर्फ उस्ताद घौरी हा या तळाचा प्रमुख होता.


जैश भारतात आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होती. त्यामुळे भारताने प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केली आहे. यात पाकिस्तानी नागरिकांना इजा होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेण्यात आली असंही गोखले यांनी सांगितलं.


निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा .


पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली आहे. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली.


पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली.


दहशतवाद्यांचा खात्मा


भारतीय लढाऊ विमानांनी LoC पार करून पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश केला. भारताकडून 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत अद्याप भारतीय वायूसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच वायूसेनेकडून याबाबत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.


सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.


पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर 14 फेब्रुवारीला हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केलेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2019 11:42 AM IST

ताज्या बातम्या