सर्वात मोठी बातमी, पुण्यातील संस्थेच्या कोरोनावरील पहिल्या लशीच्या मानवी चाचणीला मंजुरी

सर्वात मोठी बातमी, पुण्यातील संस्थेच्या कोरोनावरील पहिल्या लशीच्या मानवी चाचणीला मंजुरी

DCGI ने परवानगी दिल्यानंतर आता जुलै महिन्यापासून देशभर या लशीची मानवी क्लिनिकल चाचणी होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जून : देशभरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना एक आनंदाची बातमी आली आहे. भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोरोनावरील देशातील पहिल्या लशीच्या मानवी चाचणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. भारत बायोटेकने 'कोव्हॅक्सिन' ही कोरोनावरील भारतातील पहिली लस तयार केली असून DCGI ने परवानगी दिल्यानंतर आता जुलै महिन्यापासून देशभर या लशीची मानवी क्लिनिकल चाचणी होणार आहे.

लशीच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली असली तरीही ही मोठी प्रक्रिया असणार आहे. मात्र DCGI ने मंजुरी दिल्याने आता या प्रक्रियेला वेग येणार आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या सहकार्याने ही लस तयार करण्यात आली आहे.

दुसरीकडे, कोविड 19 चाचण्यांसाठी घरगुती वापराचे चाचणी संच लवकरच प्रत्यक्षात येणार असून दिल्लीची भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या दोन संस्था पर्यायी चाचणी पद्धत शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. लोक घरीच ही चाचणी करू शकतील व लगेच त्याचा निकालही त्यांना मिळेल. औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआरच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया या संस्थेने आर्थिक मदत दिली आहे. एक महिन्यात हा संच तयार होणार आहे.

First published: June 29, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या