Live Update: : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ साकारणार अयोध्येतील राम मंदीराची प्रतिकृती

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 15, 2022, 18:41 IST |
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:23 (IST)

  मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून अपघात
  दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, नाणेपाड्यातील घटना

  21:31 (IST)

  मुकेश अंबानी धमकी प्रकरणात आरोपीला अटक
  उद्या रिमांडसाठी गिरगाव कोर्टात करणार हजर

  21:1 (IST)

  गडचिरोली - भामरागडला महापुराचा धोका?
  पर्लकोटा, पामुलगौतम या नद्यांना मोठा पूर
  पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात भामरागडमध्ये
  दीडशेपेक्षा जास्त लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं
  मोठ्या पुलासह या भागातील काही पूल पाण्याखाली
  पुराच्या पाण्यामुळे शंभरपेक्षा जास्त गावं संपर्कहीन
  पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला
  मोबाईल, इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा ठप्प

  20:24 (IST)

  कोल्हापूर - शाहूवाडीतल्या पार्लेश्वर डॅम इथली घटना
  पर्यटनासाठी गेलेला तरुण पाय घसरल्यानं गेला वाहून
  हातकणंगले तालुक्यातील 'त्या' तरुणाचा शोध सुरू

  20:5 (IST)

  अमृत महोत्सवानिमित्त पुणे मेट्रोचं एक पाऊल पुढे
  पुणे मेट्रोनं गरवारे कॉलेज ते डेक्कन मेट्रो स्टेशन
  फुगेवाडी ते दापोडी अशी घेतली पहिली ट्रायल रन
  पुणे मेट्रोच्या दोन्ही ट्रायल रनला मोठं यश
  दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही मार्गावरचं ट्रायल यशस्वी

  18:24 (IST)

  देशभरात 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साह
  अमृत महोत्सवानिमित्त अटारी बॉर्डरवर जल्लोष
  शौर्य, साहस आणि राष्ट्रभक्तीचा अनोखा संगम

  18:1 (IST)

  गडचिरोलीला महिनाभरात दुसऱ्यांदा पुराचा तडाखा
  गोसीखुर्द धरणातून 7 लाख क्युसेकनं विसर्ग
  अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी तुटला संपर्क

  17:34 (IST)

  मुकेश अंबानींच्या कुटुंबीयांना धमकी प्रकरण
  मनोरुग्णाकडून जीवे मारण्याची धमकी
  डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  संशयित विष्णू भौमिकविरोधात गुन्हा दाखल

  17:4 (IST)

  शिंदे-फडणवीस तब्बल 18 तास काम करतात - सत्तार
  'ठाकरे किती तास काम करत होते हे माहीत नव्हतं'
  मंत्री अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

  16:54 (IST)

  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अनंतात विलीन
  मेटेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स