मराठी बातम्या /बातम्या /देश /

Independence Day 2022: तब्बल 19 हजार फूट उंचीवर दिमाखात फडकला तिरंगा; हे Video पाहून अभिमानानं भरून येईल उर

Independence Day 2022: तब्बल 19 हजार फूट उंचीवर दिमाखात फडकला तिरंगा; हे Video पाहून अभिमानानं भरून येईल उर

Independence Day 2022: तब्बल 19 हजार फुट उंचीवर दिमाखात फडकला तिरंगा; हे Video पाहून अभिमानानं भरून येईल उर

Independence Day 2022: तब्बल 19 हजार फुट उंचीवर दिमाखात फडकला तिरंगा; हे Video पाहून अभिमानानं भरून येईल उर

Independence Day Celebration by Indian Soldiers: भारतीय जवानांनी जगातील सर्वात उंच युद्धभूमी असणाऱ्या बर्फाच्छादित सियाचिन ग्लेशियरवर सियाचिन वॉरिअर्सनी दिमाखात तिरंगा फडकावला. भारतीय जवानांच्या या अनोख्या स्वातंत्र्यदिनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 ऑगस्ट : आज संपूर्ण भारत देशात 76 वा स्वातंत्र्यदिन (Independence day) अगदी उत्साहात साजरा होत आहे. देशभरातील नागरिकांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसून येत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरांपासून ते खेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी तिरंगा ध्वज मानाने फडकवला जात असतानाच सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्रदिन साजरा केला आहे. आयटीबीपीच्या जवानांनी भारत चीन सीमेलगतच्या पँगाँग लेकजवळ तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. तर जगातील सर्वात उंच युद्धभूमी असणाऱ्या बर्फाच्छादित सियाचिन ग्लेशियरवर सियाचिन वॉरिअर्सनी दिमाखात तिरंगा फडकावला. भारतीय जवानांच्या या अनोख्या स्वातंत्र्यदिनाचे व्हिडिओ  (Independence Day Celebration by Indian Soldiers) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज संपूर्ण भारत देशात 76 वा स्वातंत्र्यदिन अगदी उत्साहात साजरा होत आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी तिरंगा ध्वज मानाने फडकवला जात आहे.  प्रत्येकजण आपापल्या परिने स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज सकाळी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकावून देशाला संबोधित केलं. याशिवाय देशभरातील सर्व सरकारी कार्यालयं, शाळा, इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर तिरंगा दिमाखात फडकत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. दरम्यान स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा केला जात असतानाच आता देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना अनोख्या पद्धतीने स्वातंत्रदिन साजरा केला आहे. हेही वाचा- युवकांनो तिरंग्याची शपथ घेऊन पुढे जा! पंतप्रधानांनी सांगितलं पुढील 25 वर्षांचं महत्त्व स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रिट करण्यात आलं. भारतीय जवानांनी जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन केले. आयटीबीपी जवानांनी तब्बल 18,800 फूट उंचीवर स्वातंत्र्यदिन साजरा केला. आयटीबीपी जवानांनी भारत-चीन सीमेवरील पॅगाँग लेकजवळ स्वातंत्र्यदिन साजरा केला. 76व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सियाचिन ग्लेशियरवर भारतीय जवानांनी राष्ट्रगीत म्हटलं. सौरव सिंग आणि पवन पांडे यांनी ड्रोनच्या माध्यमातून हवेत झेंडा फडकावला.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Celebration, Independence day, Indian army

    पुढील बातम्या