Home /News /national /

BREAKING: स्वतंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद; 3 जखमी

BREAKING: स्वतंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद; 3 जखमी

श्रीनगरमध्ये असलेल्या नवगाम येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत.

    श्रीनगर, 14 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज एक दहशतवादी हल्ला झाला. श्रीनगरमध्ये असलेल्या नवगाम येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, तर 3 जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, या हल्ल्यात एक तरुणही जखमी झाला आहे. जखमींना सध्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या आसपासच्या परिसरात दहशतवाद्यांच्या शोध सुरू आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवगाम बायपासजवळ नाकाबंदीच्या वेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उद्या देशात 74 व्या स्वातंत्र्यदिन साजरा (Independence Day 2020)केला जाणार आहे. त्याआधी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानं चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सैनिक इश्फाक अहमद आणि फैज अहमद हे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या आयआरपी बटालियन -20 मध्ये तैनात होते. त्याचबरोबर जखमी सैनिक मोहम्मद अशरफ यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, या दहशतवादी हल्ल्यामागील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे दहशतवादी संघटना दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने सुरक्षा दलांमार्फत कारवाई केल्या जात आहेत. हे लक्षात घेता दहशतवादी संघटना सुरक्षा दलांना लक्ष्य करुन काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्याचा कट रचत आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Terrorist attack

    पुढील बातम्या