नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : देशात आज 74 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर सॅनिटायझेशन आणि इतर खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात लहान मुलांऐवजी यंदा कोरोना वॉरियर्स सहभागी झाले आहेत. तसंच कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
300 हून अधिक कॅमेरे 4000 हून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. लाल किल्ल्यावर सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रिनिंग सारखा नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. यावेळी ते सातव्यांदा पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण आणि देशाला संबोधन करणार आहेत.
हे वाचा-लाल चौक ते लाल किल्ला, मेजर श्वेता पांडेय करणार PM मोदींना ध्वजारोहणासाठी मदत
महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता
दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठी घोषणा करत असतात मागच्या वर्षी तीन तलाक आणि कलम 370 संदर्भात घोषणा केली होती. यंदा 6 महत्त्वाच्या गोष्टींबाबत बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयुष्यमान योजना हेल्थ कार्ड, चीनच्या कुरापतीवर आणि जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशवादी हल्ल्यांबाबत मोदी काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं असणार आहे. कोरोनाच्या लढाईतला पुढचा टप्पा कसा आणि कोणता असेल, 6 वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा, भाजपचा पुढचा अजेंडा, शेजारी देशांसोबत असणारे संबंध या 6 मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आज बोलण्याची शक्यता आहे.