independence day 2020: स्वदेशीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला मेक फॉर वर्ल्डचा मंत्र

independence day 2020: स्वदेशीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला मेक फॉर वर्ल्डचा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वाचा.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचं सावट असलं तरीही संपूर्ण काळजी घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधन करताना लहान मुलांची आठवण काढली. कोरोनामुळे यंदा लहान मुलांना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही. यंदाचा स्वतंत्र्य दिन हा कोरोना वॉरियर्स सोबत साजरा केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-आत्मनिर्भर भारत बनणं गरजेचं आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होणार, आत्मनिर्भर भारत हा देशाचा मंत्र, प्रगतीची उर्जा आत्मविश्वासानं मिळते

-काही महिन्यांत N-95 मास्क, PPE किट, वेंटिलेटर विदेशातून आयात करावे लागत होते. मात्र आज भारतात याचं उत्पादन सुरू करण्यात आलं. भारत केवळ स्वत:ची गरज पूर्ण करत नाही तर इतर देशांना मदतीचा हात देत आहे.

- कमी वेळात नवीन सायबर सुरक्षा निती येणार आहे. याशिवाय सायबर सुरक्षेसाठी एक रणनिती आखण्यात येणार आहे.

- 130 कोटी देशवासियांनी आत्मनिर्भर बनणण्याचा संकल्प केला आहे.

- जनधन योजनेच्या मार्फत कोट्यवधी रुपये गरिबांच्या थेट खात्यांपर्यंत पोहोचवले आहेत. याशिवाय दिवाळखोरीत निघालेल्या बँकांचं विलिगीकरण करण्यात आलं आहे.

- प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी कार्ड दिलं जाणार

- पंतप्रधान मोदींकडून 'व्होकल फॉर लोकल'चा नारा

- आपल्या उद्योजकांना आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे

- कोरोनाकाळातही देशात परदेशी गुंतवणूक

- एफडीआयनं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले

- देशातील सुधारणांवर जगाचं लक्ष

- कृषी क्षेत्रात मोठ्या सुधारणांची गरज

- पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे रोजगार वाढेल

- गेल्या 6 वर्षांत देशात अनेक प्रकल्प

'कोरोनाकाळात गरीबांसाठी 90 हजार कोटी खर्च'

- 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य वितरण

- 'अविकासीत 110 जिल्ह्यांना प्रगतीपथावर आणायचंय'

- शेतकरी देशात कुठेही आपला माल विकू शकतो

- कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटीचा निधी

- पिण्याचं शुद्ध पाणी हा प्रत्येकाचा अधिकार

- जलजीवन मिशनला एक वर्ष पूर्ण

- ग्रामीण उद्योगांना बळकटी देण्याची गरज

- महिलाशक्तीच्या देशाच्या विकासात वाटा

- जनधन योजनेत महिलांची 22 कोटी खाती

- भारत अंतराळक्षेत्रातही आत्मनिर्भर

- राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनला सुरुवात

- प्रत्येक नागरिकाला हेल्थ आयडी देणार

- देशात 1400 लॅबद्वारे 7 लाख कोरोना टेस्ट

- देशात कोरोनाच्या 3 लसींवर संशोधन

- पायाभूत सुविधांवर सरकारचा भर

- वर्षभरात काश्मीरच्या विकासावर भर

Published by: Kranti Kanetkar
First published: August 15, 2020, 8:37 AM IST

ताज्या बातम्या