Independence Day 2020 : PM मोदींसाठी लाल किल्ल्यावर 'कोरोना प्रूफ लेप', वाचा कशी सुरू आहे तयारी?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावर काही बदल करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावर काही बदल करण्यात आले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: देशात कोरोनाचा थैमान सुरू आहे आणि स्वातंत्र्य दिनही जवळ आला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं दिल्ली आणि लाल किल्ल्यावर तयारी करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातव्यांदा ध्वजारोहण करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनी जास्त गर्दी करणं टाळावं आणि टेक्नोलॉजीचा उपयोग करून स्वातंत्र्य दिन साजरा करावं अशी मंत्रालयाकडून सूचना देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेसोबत संवाद साधणार आहेत. या गार्ड ऑफ ऑनरमध्ये सहभागी होण्याआधी 300 पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याशिवाय यंदाचा स्वातंत्र्य दिन हा कोरोना वॉरियर्ससोबत साजरा करण्यात येणार आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या समारंभात लहान मुलांचा समावेश नसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. हे वाचा-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात दीड हजार कोरोना वॉरियर्स सहभागी होणार आहेत. 200 जवानां व्यतिरिक्ती पॅरामिलेट्री फोर्सचे जवानही सहभागी होणार आहेत. याशिवाय कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या काही निवडक लोकांना बोलवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कोरोनामुळे कार्यक्रमात बँडचा रेकॉर्डेड व्हिडीओ लावण्यात येणार आहे. याशिवाय चेकिंगसाठी पीपीई किट घालून जवान उभे असणार आहेत. मास्क, आरोग्य अॅप आणि सोशल डिस्टन्सचं पालन करणं अत्यावश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरून तीन तलाक आणि कलम 370 संदर्भात घोषणा केली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: