श्रीनगर, 14 ऑगस्ट : जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर पहिल्यांदा स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला जातो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचं विधेयक नुकतंच संमत झालं. काश्मीरला स्वायत्त दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर अजूनही काश्मीरमध्ये संचारबंदी लागू आहे. अजूनही मोबाईल, इंटरनेट यावरची बंधनं कायम आहेत. काश्मीरच्या परिस्थितीवर साऱ्या जगाचं लक्ष आहे. अशात गुरुवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन महत्त्वाचं ठरणार आहे.
श्रीनगरला होणाऱ्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर संचलन होईल त्यात सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीचं नेतृत्व एक महिला अधिकारी करणार आहे. श्रीनगरमध्ये तिरंग्याला सलामी देण्याचा मान तनुश्री या BSF अधिकारी महिलेला मिळणार आहे. सध्या तनुश्री भारत -पाक सीमेवर नियंत्रणरेषेवर तैनात आहे.
देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकारचा हा आहे मास्टरप्लॅन
श्रीनगरच्या शेर ए कश्मीर स्टेडियमध्ये स्वातंत्र्यदिनाचा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात संचलनासाठी BSF ने तनुश्रीची निवड केली आहे. तनुश्री सध्या काश्मीर सीमेवरच तैनात आहे. काश्मीर खोऱ्यात कुपवाडा इथे त्यांचं पोस्टिंग आहे. एवढंच नाही तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्या तैनात आहेत. तनुश्री यांचं प्रशिक्षण मध्ये प्रदेशात ग्वाल्हेरला झालं. त्या सीमा सुरक्षा दलात सहायक कमांडंट पदावर आहेत.
महाराष्ट्र पोलिस दलाला 46 राष्ट्रपती पदके, आबांच्या भावाचा दुसऱ्यांदा सन्मान
तनुश्री या BSF मध्ये निवड झालेल्या देशातल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी ग्वाल्हेरच्या टेकनपूर BSF अकादमीमधून ट्रेनिंग घेतलं होतं. तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमध्ये तैनात या महिला ऑफिसरचं कौतुक केलं होतं.
-------------------------------------------------------------------
VIDEO : नाना पूरग्रस्तांच्या भेटीला, राजकारण करणाऱ्यांना फटकारलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Article 370, Bsf, Jammu and kashimir, Srinagar