काय सांगता! डेटॉलचे लिक्विड कोरोना व्हायरसचा खात्मा करू शकतात?

काय सांगता! डेटॉलचे लिक्विड कोरोना व्हायरसचा खात्मा करू शकतात?

डेटॉलचा लिक्विड सोप वापरल्याने कोरोनाचे विषाणू मारले जाऊ शकतात, असा संदेश पसरवला जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू ओढवला आहे. अशा परिस्थितीत तेथील लोक बचावासाठी प्रयत्न करीत आहेत. हे फक्त चीनमध्ये  नाही तर अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. डेटॉलचा लिक्विड सोप वापरल्याने कोरोनाचे विषाणू मारले जाऊ शकतात, असा संदेश पसरवला जात आहे. डेटॉलचे लिक्विड जखमांवर लावल्यास किंवा या लिक्विडने हात साफ केल्यास कोरोनापासून सुटका होऊ शकते, हा संदेश काही तासांमध्ये व्हायरल झाला आहे. खरंच असं होऊ शकतं का, असा प्रश्न विचारला जात आहे. हा संदेश इतक्या मोठ्या प्रमाणात जगभरात पसरला की अखेर डेटॉलच्या कंपनीला यासंदर्भात खुलासा द्यावा लागला. कोरोना व्हायरसमुळे लोकांची दिशाभूल होऊ नये यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा जारी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डेटॉल लिक्विड स्प्रेमुळे कोरोना व्हायरसचा खात्मा केला जाऊ शकत नाही. कोरोना व्हायरससाठी डेटॉलचा लिक्विड स्प्रे प्रभावी असल्याचा दावा करता येऊ शकत नाही, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

काय आहेत लक्षणं

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे तत्सम लक्षण दिसून येत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मात्र नेहमीपेक्षा काही वेगळी वा तीव्र लक्षणे दिसून येत असल्यास तातड़ीने आपल्या जवळील सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधा.

चीनच्या अनेक शहरांमध्ये जाण्यास बंदी

कोरोना विषाणूमुळे चीनच्या शहरांवरील हालचालींवर पूर्णपणे बंदी घातली आहे. चीनमध्ये 300 लोकांचा मृत्यू झाला असून त्याव्यतिरिक्त हजारो लोक संक्रमित आहेत. वुहानसह 9 शहरे बंद करण्यात आली आहेत. वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात. त्या संदर्भात चीनने प्रशासनाशी बोलणे केले आहे. यापूर्वी अहवालानुसार, चीनमधून परत आलेल्या दोन लोकांना कोरोना विषाणूची (Corona virus) लागण होण्याची भीती होती. या दोन्ही रूग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रुग्णांमध्ये हलकी थंडी व सर्दीची लक्षणे आहेत. सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

First published: February 11, 2020, 8:40 AM IST

ताज्या बातम्या