केनिया, 01 ऑक्टोबर: सध्या केनियामधील मसाई मारा नॅशनल पार्कमधील खास आकर्षणाचा विषय आहे तो म्हणजे पोल्का झेब्रा त्याला तीरा असंही तिथे म्हटलं जातं. झेब्रा हा फक्त पांढरे आणि काळे पट्टे असलेला माहीत असतो मात्र मसाई मारा इथे तपकिरी रंग आणि त्यावर पांढरे ढिपके असलेला हा झेब्रा पर्यटकांचे खास लक्ष वेधून घेणारा आहे. मुंबईतील वन्यजीवन छायाचित्रकार सिद्धेश मुणगेकर यांच्या कॅमेऱ्यात तीराची काही खास दृश्यं कैद झाली आहे.