आसाम, 03 डिसेंबर : आसाममधील ऑल इंडिया युनायडेट डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) अध्यक्ष आणि खासदार बदरुद्दीन अजमल वादात सापडले आहेत. "हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांसारखी वेगानं वाढत नाही, ही त्यांची समस्या आहे. लोकसंख्या वाढीच्या मुस्लिम सूत्राची नक्कल करण्यासाठी हिंदूंनी त्यांच्या मुलींचं 18 ते 20 वर्षे वयातच लग्न लावून दिलं पाहिजे," असं धक्कादायक वक्तव्य अजमल यांनी केलं आहे. तसंच, "हिंदू योग्य वयात लग्न करत नाहीत. दोन-तीन अफेअर करतात पण लग्न करत नाहीत. वयाच्या चाळीशीमध्ये ते लग्न करतात, तेही कौटुंबिक दबावाखाली. असं असेल तर त्यांची लोकसंख्या कशी वाढेल? असंही ते म्हणाले.
बदरुद्दीन अजमल आसाममधील करिमगंज येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी लोकसंख्यावाढीच्या प्रश्नाला उत्तर देताना हिंदू मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले की, कर्नाटक वक्फ बोर्ड मुस्लिम मुलींसाठी 10 महाविद्यालयं उघडणार आहे. मी त्यांना आवाहन करेन की त्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयांमध्ये हिंदू मुलींना प्रवेश द्यावा. आम्हाला सर्व मुलींना शिक्षण द्यायचं आहे.
#WATCH | Hindus should follow the Muslim formula of getting their girls married at 18-20 years, says AIUDF President & MP, Badruddin Ajmal. pic.twitter.com/QXIMrFu7g8
— ANI (@ANI) December 2, 2022
अजमल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "आमच्या मुस्लिम समुदायात, मुली 18 वर्षांच्या झाल्या की लगेच त्यांचं लग्न करतात. मुलंही 22 वर्षांची झाल्यावर लगेच लग्न करतात. भारत सरकारनंही याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आमची लोकसंख्या वाढत आहे. हिंदूंनीदेखील त्यांच्या मुलींचं वयाच्या 18व्या वर्षीच लग्न लावलं पाहिजे. कारण, पडिक जमिनीवर शेती होत नाही, सुपीक जमिनीवर होते."
(बेळगावसाठी गुवाहाटीला का नवस मागायला जात नाही? उद्धव ठाकरेंचा शिंदेंना सणसणीत टोला)
अजमल यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आसाममधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आमदार डी. कलिता यांनी अजमल यांना कडक इशारा दिला आहे.
"असं बोलून तुम्ही तुमच्या आई-बहिणीवर आरोप करत आहात. मी याचा निषेध करतो. तुम्ही असं करू नका, अन्यथा बांगलादेशात जा. हिंदू अशी वक्तव्य अजिबात स्वीकार करणार नाहीत. राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नका आणि आई-बहिणीची विक्री करू नका. त्यांची प्रतिष्ठा पायदळी तुडवू नका," असं कलिता अजमल यांना उद्देशून म्हणाले.
('यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा', उदयनराजेंचा रायगडावरून थेट इशारा)
"तुम्ही मुस्लिम आहात आणि आम्ही हिंदू आहोत. तुम्ही आम्हाला शिकवणार का? हा भगवान राम आणि देवी सीता यांचा देश आहे. येथे बांगलादेशींना स्थान नाही. आम्हाला मुस्लिमांकडून काहीही शिकण्याची गरज नाही," असंही आमदार डी. कलिता म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.