मराठी बातम्या /बातम्या /देश /

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; होम, पर्सनलसह कार लोनच्या व्याजदरात वाढ

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; होम, पर्सनलसह कार लोनच्या व्याजदरात वाढ

खासगी बँकांकडून सर्व प्रकारच्या कर्जावरच्या व्याजदरात वाढ झाल्याने ग्राहकांना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे

खासगी बँकांकडून सर्व प्रकारच्या कर्जावरच्या व्याजदरात वाढ झाल्याने ग्राहकांना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे

खासगी बँकांकडून सर्व प्रकारच्या कर्जावरच्या व्याजदरात वाढ झाल्याने ग्राहकांना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे

    नवी दिल्ली, 7 जुलै : सर्वसामान्य नागरिक महागाईने पुरते मेटाकुटीस आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना आता ईएमआयचा (EMI- Equated Monthly Installment) हप्ता वाढून लोकांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. आरबीआयने (Reserve Bank Of India) नुकतीच रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर खासगी बँकांकडून सर्व प्रकारच्या कर्जावरच्या व्याजदरात वाढ झाल्याने ग्राहकांना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. खासगी क्षेत्रातल्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) तर वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जांसाठीच्या एमसीएलआर (Marginal Cost Of Funds-Based Lending Rate) दरांमध्ये 20 बेसिस पॉइंट्सने म्हणजेच 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे गृहकर्ज (Home Loan), वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आणि कार कर्जाच्या (Car Loan) व्याजदरात वाढ होणार आहे. याचाच अर्थ, ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. एचडीएफसी बँकेने 7 जुलै 2022 पासून नवीन व्याजदर लागू केले आहेत. त्याबद्दलचं वृत्त ‘टीव्ही नाइन हिंदी’ने दिलं आहे. वाढलेल्या व्याजदरांबाबतची माहिती एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यात म्हटल्याप्रमाणे, बहुतांश ग्राहक जोडल्या गेलेल्या एमसीएलआरच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने एका रात्रीचा कालावधी असलेल्या एमसीएलआरचा व्याजदर 7.50 टक्क्यांवरून 7.70 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. एक महिन्याचा कालावधी असलेल्या एमसीएलआरचे दर 7.75 टक्के करण्यात आले आहेतच. 3 महिने कालावधी असलेल्या एमसीएलआरचे नवे दर 7.80 आणि 6 महिने कालावधीसाठीचे दर 7.90 टक्के करण्यात आले आहेत. याशिवाय एक वर्ष कालावधीसाठी एमसीएलआर दर 8.05 टक्के करण्यात आला आहे. हेही वाचा - VIDEO: नदीत कोसळलेली कार सापडली; दोघांना वाचवण्यासाठी ITBP चे थरारक प्रयत्न एचडीएफसी बँकेने 2 वर्षं कालावधी असलेल्या एमसीएलआरचे व्याजदर 8.15 टक्के आणि 3 वर्षं कालावधीचे एमसीएलआर व्याजदर 8.25 टक्के केले आहेत. या बँकेने मागील महिन्यात 7 जूनपासून दरांमध्ये 35 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.35 टक्के वाढ केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर देशातल्या अनेक बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8 जूनला रेपो दरात 0.50 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर रेपो दर 4.40 टक्क्यांवरून वाढून 4.90 टक्के झाला होता. याआधी रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्के वाढ केली होती. दरम्यान, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ करण्यात आल्याचा परिणाम कर्ज घेणाऱ्या नागरिकांवर होत आहे. कर्जाच्या हप्त्यात वाढ होत असल्याने त्यांचं बजेट कोलमडत आहे.
    First published:

    Tags: Hdfc bank

    पुढील बातम्या