मराठी बातम्या /बातम्या /देश /New Year 2022: नव्या वर्षात ग्राहकांना बसणार आर्थिक झळ, 'या' गोष्टी होणार महाग

New Year 2022: नव्या वर्षात ग्राहकांना बसणार आर्थिक झळ, 'या' गोष्टी होणार महाग

नव्या वर्षाच्या(New Year) स्वागतासाठी सर्व जग तयार झाले आहे. नवीन संकल्प, नवीन आशा, नवीन प्लॅनिंग याचा उत्साह आहे. मात्र नव्या वर्षात नागरिकांचे स्वागत महागाईने होणार आहे.

नव्या वर्षाच्या(New Year) स्वागतासाठी सर्व जग तयार झाले आहे. नवीन संकल्प, नवीन आशा, नवीन प्लॅनिंग याचा उत्साह आहे. मात्र नव्या वर्षात नागरिकांचे स्वागत महागाईने होणार आहे.

नव्या वर्षाच्या(New Year) स्वागतासाठी सर्व जग तयार झाले आहे. नवीन संकल्प, नवीन आशा, नवीन प्लॅनिंग याचा उत्साह आहे. मात्र नव्या वर्षात नागरिकांचे स्वागत महागाईने होणार आहे.

    नवी दिल्ली, 31 डिसेंबर: आज 31 डिसेंबर आहे म्हणजेच यावर्षाचा (thirty first ) शेवटचा दिवस. सध्या जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र, ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या प्रसारामुळं त्या तयारीवर काही मर्यादा आल्या आहेत. असं असलं तरीही अनेकांनी घरगुती स्वरुपात नवीन वर्षाच्या (New Year) स्वागताची तयारी केली आहे. आता अवघ्या काही तासांनंतर नवीन वर्षाचं (2022) आगमन होईल. त्यानिमित्त अनेकांनी नवीन संकल्प केले असतील.

    येणारं वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन यावं, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. सामान्य माणसाप्रमाणं सरकारदेखील येणाऱ्या वर्षाचं नियोजन केलं आहे. या नियोजनामध्ये सरकारनं यावर्षी जनतेच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार (financial burden) टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

    फक्त 10 रुपयात मिळणार LED बल्ब; जाणून घ्या केंद्र सरकारची Gram Ujala Yojana

    1 जानेवारी 2022 पासून विविध गोष्टींच्या किमती वाढणार आहेत. त्याबाबत सरकारनं यापूर्वीच घोषणा केलेल्या आहेत. एक जानेवारीपासून या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. नवीन वर्षात एटीएममधून पैसे काढणं, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) पैसे जमा करण्यासाठी शुल्क लागणार आहे. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    चपला आणि कपडे होणार महाग

    कपडे आणि चपला (Footwear) या गोष्टी आपल्या अत्यावश्यक गरजांमध्ये येतात. पाहिजे तेव्हा आपण या वस्तूंची खरेदी करतो. मात्र, नवीन वर्षात या दोन वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, शासनानं चपला आणि रेडिमेड कपड्यांवरील (Readymade clothes) जीएसटीमध्ये (GST) वाढ केली आहे. पूर्वी चपला आणि रेडिमेड कपड्यांवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आला होता. आता तो 12 टक्के करण्यात आला असून 1 जानेवारी 2022 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. शासनानं रेडिमेड कपड्यांवरील जीएसटी वाढवला असला तरी खादी कपड्यांवरील टॅक्स 'जैथे थे' ठेवला आहे.

    भारतीय तरुणावर जडला जीव, 5000 किलोमीटरवरून आली परदेशी वधू

    बँकेतील व्यवहारांसाठी लागणार शुल्क!

    आयपीपीबी (India Post Payments Bank) या बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी आता शुल्क आकारलं जाणार आहे. बचत आणि चालू खात्यांतून दरमहा 25 हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम विनाशुल्क काढता येईल. त्यापुढील व्यवहारांवर 0.50 टक्के या प्रमाणं प्रतिट्रॅन्झॅक्शन किमान 25 रुपये आकारले जातील. याशिवाय आयपीपीबीमध्ये महिन्याकाठी फक्त 10 हजार रुपयांपर्यंतची रोख ठेव काढणं पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यानंतर 0.50 0.50 टक्के या प्रमाणं प्रतिट्रान्झॅक्शन किमान 25 रुपये आकारले जातील.

    पोस्टातील बचत योजनांचे व्याजदर बदलणार

    भारतीय पोस्ट विभागातील छोट्या बचत योजनांच्या (Post Saving schemes) व्याजदरात (Interest rate) नवीन वर्षात बदल होणार आहेत. कोणत्या योजनेचे व्याजदर किती बदलणार आहे, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, बचत योजनांवरील व्याजदर हे 'बाँड यील्ड' (Bond yield) लक्षात घेऊन निश्चित केले जातात. त्यानुसार हे व्याजदर बदलतील हे नक्की. सध्या पोस्टाच्या सर्व योजनांपैकी, सुकन्या समृद्धी खात्यावर सर्वाधिक 7.6 टक्के व्याजदर मिळत आहे.

    HNY 2022: 'या' खास आणि प्रसिद्ध ठिकाणी सेलिब्रेट करा नववर्ष, पाहा PHOTOS

    कॅश मिळवणं होईल महाग

    सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंटला (Online Payment) जास्त महत्त्व दिलं जात आहे. तरी देखील काहीवेळा आपल्याला कॅशची (Cash) आवश्यकता भासते. अशावेळी आपण एखाद्या एटीएममध्ये (ATM) जाऊन कॅश काढण्याला प्राधान्य देतो. आता 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढणं देखील महाग होणार आहे. आतापर्यंत फ्री ट्रान्झॅक्शन (Free transaction) संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी 20 रुपये शुल्क मोजावं लागत होतं. या शुल्कामध्ये एक रुपयानं वाढ करण्यात आली असून आता फ्री ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 21 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.

    कारच्या किंमती वाढणार

    2022मध्ये कार उत्पादक कंपन्यांनी गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील जवळपास 10 ऑटोमोबाईल कंपन्या (Automobile companies) 1 जानेवारी 2022पासून कारच्या किंमती वाढवणार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स (Tata Motors), फोक्सवॅगन, टोयोटा, होंडा या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे.

    ऑनलाईन कॅब बुकिंगही (Online cab booking) महागणार

    नवीन वर्षात, ऑनलाईन किंवा मोबाईल अॅपद्वारे कॅब, ऑटो रिक्षा, बाईक बुक करण्यासाठी ग्राहकांकडून 5 टक्के कर आकारला जाणार आहे. याशिवाय स्विगी (Swiggy) आणि झोमॅटोसारख्या (Zomato) ऑनलाइन फूड (Online Food) ऑर्डरिंग अॅप्स देखील आपल्या ऑर्डरवर सर्व्हिस टॅक्स वाढवणार आहेत.

    First published:

    Tags: GST, New year