आता इन्कम टॅक्स रिटर्न्स भरा 5 आॅगस्टपर्यंत

आता इन्कम टॅक्स रिटर्न्स भरा 5 आॅगस्टपर्यंत

शेवटच्या दिवसांमध्ये रिटर्न्स भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. सव्हर्रही स्लो होता.

  • Share this:

31 जुलै : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स भरला नसेल तर काळजीचं कारण नाही. आता ही मुदत वाढवण्यात आली असून 5 ऑगस्टपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न्स भरता येणार आहेत. इन्कम टॅक्स विभागानं आज ही मुदत वाढ देण्याची घोषणा केली.

शेवटच्या दिवसांमध्ये रिटर्न्स भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. सव्हर्रही स्लो होता. त्यामुळे मुदत वाढून द्यावी अशी मागणी होत होती. 5 ऑगस्टनंतर मात्र ही मुदत वाढवून दिली जाणार नाही.

तर दुसरीकडे गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यभर ठिकठिकाणी शेतकरी पीक विमा भरण्यासाठी रांगा लावून आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचा घोळ कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही पिक विमा भरण्याची तारीख वाढवून द्यावी अशी मागणी होतेय. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात त्याबद्दल सकारात्मकता दाखवलीय. त्यावरही आज निर्णय अपेक्षित आहे. कारण पीक विमा भरण्याचाही आजचा शेवटचा दिवस आहे.

First published: July 31, 2017, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading