कांदा व्यापारी इन्कम टॅक्सच्या रडारवर, देशभरात छापासत्र

कांदा व्यापारी इन्कम टॅक्सच्या रडारवर, देशभरात छापासत्र

कांद्याचे दर प्रतिकिलो 100 रुपयांच्या वर पोहचले असून साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने मोहिम हाती घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली असून आता शंभरी पार केली आहे. कांद्याची साठवणूक केल्यानं दर भडकल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाल्यानंतर देशभरातले व्यापारी रडारवर आले आहेत. प्राप्तिकर विभागाने देशात 100 हून अधिक ठिकाणी छापा मारण्यास सुरुवात केली आहे.

प्राप्तिकर विभागाने देशात दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, चंदिगढ, नागपूर, नाशिक आणि मुंबईत छापेमारी सुरू केली आहे.  दरम्यान, त्याआधी सरकारने भाव नियंत्रणात आणण्यासाठी एक लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय शनिवारी घेतला होता. दिल्लीसह अनेक ठिकाणी कांद्याचे दर 100 रुपयांवर पोहोचले आहेत.

महाराष्ट्रातील लासलगावसह पिंपळगाव बाजारात कांद्यांचे दर प्रचंड भडकले आहेत. दरम्यान केंद्र सरकारच्या वतीनं काद्यांची आयात मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळं येत्या काळात कांद्याच्या दरात घट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आसला आहे. मात्र सरकारनं सामन्यांना दिलासा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कांद्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत.

कांद्यानं लासलगावसह पिंपळगाव बाजारात सहा हजाराचा टप्पा गाठला. मात्र मंगळवारी दोन्ही बाजार समितीत कांद्याचे भाव एक हजार प्रति क्विंटलनं घसरल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर, किरकोळ बाजारात प्रतिकिलो 70 ते 80 रुपयांच्या घरात पोहचले आहेत.

किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यात कांद्यांच्या घाऊक बाजारात चारपटीनं दरात वाढ झाली आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळं दर भडकल्याचे तर, यंदा अवकाळी पावसामुळं कांद्याचे भाव वधारले आहेत. दुसरीकडे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत लाल कांद्याचे भाव मात्र 650 रुपयांन वधारले आहेत.

Published by: Suraj Yadav
First published: November 11, 2019, 2:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading