विष्णूचा दहावा अवतार सांगत क्लार्क झाला अब्जाधीश, आयकर विभागाने जप्त केली 93 कोटींची रोकड

क्लार्क म्हणून काम करणाऱ्याने एक संस्था स्थापन केली. त्यानंतर स्वत:ला विष्णूचा दहावा अवतार कल्की घोषित करून मोठ्या प्रमाणमावर संपत्ती जमवली.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 10:20 PM IST

विष्णूचा दहावा अवतार सांगत क्लार्क झाला अब्जाधीश, आयकर विभागाने जप्त केली 93 कोटींची रोकड

बेंगळुरु, 19 ऑक्टोबर : आयकर विभागाने एका कथित आध्यात्मिक गुरूच्या आश्रमावर छापा टाकला असून यात मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आली आहे. कथित गुरुचे नाव कल्की भगवान असं आहे. त्यांनी सुरुवातीला लाइफ इन्शुरन्सचा क्लार्क म्हणून काम करायला सुरुवात केली होती. आता स्वत:ला भगवान विष्णूचा 10 वा अवतार असल्याचं सांगत आहेत. शुक्रवारी आयकर विभागाने बेंगळुरू येथील आश्रमावर छापा मारला तेव्हा तब्बल 93 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. याशिवाय दुसऱ्या आश्रमांवर मारलेल्या छाप्यात 409 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचंही समोर आलं आहे.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्की आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांच्या आंध्र प्रदेश, तामिळनाडुसह 40 ठिकाणी छापा मारण्यात आला. आयकर विभागानं एकाच वेळी चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू या ठिकाणी छापा मारला.

कल्कीने त्यांच्या समुहाची स्थापना 1980 मध्ये केली होती. त्यानंतर याचा विस्तार झाला. यामध्ये रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन आणि क्रीडा क्षेत्राचा समावेश आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही समुहाने पाय पसरले आहेत. ट्रस्टच्यावतीने समूह दर्शन आणि अध्यात्म यामध्ये कार्यक्रम आणि ट्रेनिंग प्रोग्रॅम असायचा. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून परदेशी नागरीकांनाही भूरळ पाडली. यामुळे परदेशी चलनही मोठ्या प्रमाणावर मिळालं.

ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या पावत्यांमध्ये हेराफेरी केली जात होती. ते पैसे रिअल इस्टेटमध्ये वापरले जात होते. याच्या जोरावर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडुत मोठ्या प्रमाणावर जमीनीची खरेदी केली. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत. आश्रमाला लोकांकडून मिळालेल्या डोनेशनची माहिती लपवण्यात आली. आश्रम आणि समुहातील स्टाफ अकाउंट बुकशिवाय रोख रक्कमही ठेवत असत. याशिवाय प्रॉपर्टी चढ्या भावाने विकून पैसे कमवत होते.

आयकर विभागाच्या छाप्यात 25 लाख अमेरिकन डॉलर म्हणजेज जवळपास 18 कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळाले आहे. याशिवाय 88 किलो सोनंही सापडलं आहे. याची किंमत 26 कोटी रुपये इतकी होते. तसेच 5 कोटी रुपयांचे हिरे आयकर विभागाला सापडले आहेत. या तपासात संपूर्ण ग्रुपच्या 500 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती सापडली आहे.

Loading...

लाइफ इन्श्युरन्स कार्पोरेशनमध्ये क्लार्क म्हणून काम करणाऱ्या विजय कुमार यांनी 1980 मध्ये एक इन्स्टिट्यूट उघडली. जीवाश्रम नावाने शाळा सुरू केल्यानंतर चित्तूर इथं एक विद्यापीठही उघडलं. 1990 पर्यंत त्यांनी स्वत:ला विष्णूचा दहावा अवतार कल्की असंही घोषित केलं. त्यानंतर प्रसिद्धी मिळत गेली. अनेक मान्यवर व्यक्ती आणि सिने जगतातील व्यक्ती त्यांचे शिष्य, अनुयायी झाले. त्यांनी ट्रस्टमध्ये पत्नी पद्मावती आणि मुलगा एनकेव्ही कृष्णा यांना भागिदार केले.

VIDEO : राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 08:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...