News18 Lokmat

Income Tax Raids : सीआरपीएफ आणि मध्य प्रदेश पोलीस भिडले

मध्य प्रदेशातही पश्चिम बंगालप्रमाणे स्थानिक पोलीस आणि केंद्रीय संस्था आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 08:26 PM IST

Income Tax Raids : सीआरपीएफ आणि मध्य प्रदेश पोलीस भिडले

भोपाळ, 7 एप्रिल : मध्य प्रदेशातही पश्चिम बंगालप्रमाणे स्थानिक पोलीस आणि केंद्रीय संस्था आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारचे पोलीस आणि सीआरपीएफचे जवान आपापसांत भिडले आहेत. याव्यतिरिक्त स्थानिक पोलिसांनी भोपाळ आणि इंदुरमध्ये आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणीदेखील घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळमध्ये प्लेटिनम प्लाझा येथे आयकर विभागानं छापा टाकत कारवाई केली. यादरम्यान, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफचे जवान आपापसांत भिडले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. माजी पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांच्या घरावर एकाच वेळी वेगवेगळ्या पथकाने छापा टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कक्कड यांच्या विजय नगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. त्याच वेळेस नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशमधील कक्कड यांच्याशी संबंधित असलेल्या 15 ठिकाणीदेखील आयकर विभागाने छापे टाकले आहेत.



Loading...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात तीन राज्यांमध्ये जवळपास 50 ठिकाणांवर छाप टाकण्यात आला आहे. जवळपास 300 अधिकारी हे ऑपरेशन राबवत आहेत. आतापर्यंत एकूण 9 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. कमलनाथ यांच्या खासगी सचिवांचे खूप जवळचे मानले जाणारे प्रतीक जोशी यांच्याही घरावर छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. भोपाळ, इंदुर, गोवाव्यतिरिक्त द‍िल्लीतील 50 ठिकाणांवर छापा टाकण्यात आला आहे. प्रतीक जोशी यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोखरक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



वाचा अन्य बातम्या

VIDEO: 'मोदी पंतप्रधान नाही झाले तर निदान खासदार तरी होतील'

VIDEO: तावडेंची हिम्मत असेल तर...मनसे नेत्याचं खुल्लं चॅलेंज

नव्या सर्व्हेने मोदींची चिंता वाढवली, NDA बहुमतापासून दूर





















VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...