तामिळनाडूतील जया टीव्हीवर आयकरची धाड

 तामिळनाडूतील जया टीव्हीवर आयकरची धाड

जया टिव्ही हे चॅनल तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सुरू केलं होतं. तामिळनाडूतलं एक महत्त्वाचं प्रादेशिक चॅनल म्हणून ओळखलं जायचं.

  • Share this:

चेन्नई,09 नोव्हेंबर: तामिळनाडूतील प्रसिद्ध जया टिव्हीवर आज आयकर विभागाचे छापे पडले आहेत. कर चुकवल्याप्रकरणी हे छापे पडल्याचं सांगण्यात येतंय.

जया टिव्ही हे चॅनल तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सुरू केलं होतं. तामिळनाडूतलं एक महत्त्वाचं प्रादेशिक चॅनल म्हणून ओळखलं जायचं. आयकर विभागाने जया टिव्हीच्या वेगवेगळ्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत.जया टिव्हीची सगळी सूत्र जयललिताच्या मृत्यूनंतर शशिकलाच्या कुटुंबाकडे होती. शशिकला सध्या जेलमध्ये आहेत. गेले काही दिवस तामिळ नाडू सरकारवर हे चॅनल प्रचंड आगपाखड करत होते. शशिकलांच्या कुटुंबियांच्या इतरही प्रोपर्टीवर छापे पडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. जॅझ सिनेमावरसुद्धा धाड पडली आहे.

आता या धाडीतून काय निष्पन्न होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 9, 2017, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading