मुंबई, 5 जुलै : Indian Union Budget 2019 मोदी सरकारच्या कार्यकाळातलं पहिलं बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इनकम टॅक्सच्या रचनेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे 5 लाख रुपये उत्पन्नावर कर असणार नाही. पण 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना जुन्या रचनेप्रमाणेच कर भरावा लागणार आहे.
सरचार्ज वाढला
कररचनेत बदल झाला नसला तरी 2 ते 5 लाख रुपये उत्पन्नावरचा सरचार्ज म्हणजे अधिभार मात्र वाढला आहे. 2 लाख ते 5 लाख उत्पन्न असणाऱ्यांसाठी 3 टक्के सरचार्ज लागेल. 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 7 टक्के सरचार्ज भरावा लागेल.
इनकम टॅक्स भरण्यासाठी पॅनकार्ड गरजेचं नाही
इनकम टॅक्स भरण्यासाठी आता पॅन कार्ड सक्तीचं नाही. म्हणजे पॅन कार्डशिवायच तुम्ही इनकम टॅक्स भरू शकता. इनकम टॅक्स रिटर्नसाठीही पॅनकार्ड गरजेचं नाही. तुमच्याकडे आधार कार्ड असलं तरी चालू शकतं. इनकम टॅक्सची नोटीस पाठवण्यासाठी आता केंद्रीय स्तरावर एक विभाग करण्यात येणार आहे.
अशी असेल इनकम टॅक्सची रचना
अडीच लाख ते 5 लाख उत्पन्नावर 5 टक्के कर
5 लाख ते 10 लाख उत्पन्नावर 20 टक्के कर
10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 30 टक्के कर
Union Budget 2019 : भाड्यानं घर घेऊन राहणाऱ्यांसाठी खुशखबर
======================================================================================================
<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-388090" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzg4MDkw/"></iframe>