नवीन वर्षात टॅक्स धारकांना मोदी सरकार देणार मोठी भेट, असे होणार बदल

नवीन वर्षात टॅक्स धारकांना मोदी सरकार देणार मोठी भेट, असे होणार बदल

टॅक्सच्या दरांमध्ये काही बदल होण्याची शक्यता असून जास्तीत जास्त लोकांनी टॅक्स भरावा यासाठी सरकार प्रोत्साहन देणार असून त्यासाठी अनेक प्रस्ताव अर्थमंत्रालयाला मिळाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 26 डिसेंबर : देश सध्या आर्थिक अडचणींमधून वाट काढतोय. विकासाचा वेगही मंदावलाय. ऑटो सेक्टरसह अनेक क्षेत्रांमध्ये घसरण सुरू आहे. ही घसरण थांबविण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाय केले आहेत. आता नव्या वर्षात अर्थ मंत्रालय बजेटच्या तयारीला लागलं आहे. या बजेटमध्ये अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. यात सगळ्यांचं लक्ष लागलंय ते टॅक्सच्या दरांकडे प्रामाणिकपणे टॅक्स (Income Tax 2019) भरणाऱ्या लोकांना या नव्या वर्षात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टॅक्सच्या दरांमध्ये काही बदल होण्याची शक्यता असून जास्तीत जास्त लोकांनी टॅक्स भरावा यासाठी सरकार प्रोत्साहन देणार असून त्यासाठी अनेक प्रस्ताव अर्थमंत्रालयाला मिळाले आहेत. त्यावर सरकार विचार करत असून अर्थसंकल्पादरम्यान नव्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

डायरेक्ट टॅक्सची समिक्षा करणाऱ्या समितीने सरकारला काही प्रस्ताव दिले आहेत. त्यात 10 लाखांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी 10 टक्के दर ठेवण्याची शिफारस करण्यात आलीय. तर 10 लाख ते 20 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी 20 टक्के, 20 लाख ते 2 कोटी उत्पन्न असणाऱ्यांसाठी 30 टक्के आणि 2 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांसाठी 35 टक्के टॅक्स असावा अशी शिफारस करण्यात आलीय. सध्या 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स द्यावा लागत नाही. तो स्लॅब वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. पण आर्थिक उत्पन्न घटत असताना सरकार ही जोखम उचलणार का याबद्दल विविध मतप्रवाह आहेत.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, हा नियम झाला सोपा

लक्षात ठेवा KYCचे नवे बदल

तुमच्या बँक खात्याच्या 'Know Your Customer' म्हणजेच KYC फॉर्मवर आता तुमच्या धर्माची माहिती द्यावी लागू शकते. यामुळे NRO खातं उघडण्यासाठी किंवा मुस्लिमांशिवाय अन्य धार्मिक अल्पसंख्याक लोकांना मालमत्ता खरेदीसाठी मदत होईल. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने फॉरिन एक्सेंज मॅनेजमेंट रेग्युलेशन मध्ये बदल केले आहेत. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन या सगळ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलाय.

खूशखबर! नव्या वर्षाच्या सुटीसाठी 899 रुपयांत बुक करा विमानाचं तिकीट

पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. दीर्घकाळासाठी व्हिसा घेऊन भारतात राहणारे लोकही मालमत्ता खरेदीपासून ते बँक खातंही उघडू शकतात. या नियमात नास्तिक आणि मुस्लीम लोकांचा समावेश नसेल. त्याचबरोबर म्यानमार, श्रीलंका आणि तिबेट या देशांतून आलेले लोकही नसतील. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँकेकडून याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं मिळालेली नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Income tax
First Published: Dec 26, 2019 03:05 PM IST

ताज्या बातम्या