निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई, 'आयटी'कडून 30 तासांपासून धाडसत्र सुरूच

निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई, 'आयटी'कडून 30 तासांपासून धाडसत्र सुरूच

मागील 30 तासापासून आयकर विभागाची कारवाई सुरू आहे.

  • Share this:

भोपाळ, 08 एप्रिल : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशात आयकर विभागाने मोठी कारवाई केली. माजी पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांच्या घरावर एकाच वेळी वेगवेगळ्या पथकाने छापा टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कक्कड यांच्या विजय नगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. त्याच वेळेस नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशमधील कक्कड यांच्याशी संबंधित असलेल्या 15 ठिकाणीदेखील आयकर विभागाने छापे टाकले आहेत. दरम्यान, मागील 30 तासापासून ही कारवाई सुरूच आहे. प्रविण कक्कड हे मध्यप्रदशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी आहेत.




देशभरात तीन राज्यांमध्ये जवळपास 50 ठिकाणांवर छाप टाकण्यात आला आहे. जवळपास 300 अधिकारी हे ऑपरेशन राबवत आहेत. आतापर्यंत एकूण 9 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. कमलनाथ यांच्या खासगी सचिवांचे खूप जवळचे मानले जाणारे प्रतीक जोशी यांच्याही घरावर छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. भोपाळ, इंदुर, गोवाव्यतिरिक्त दिल्लीतील 50 ठिकाणांवर छापा टाकण्यात आला आहे. प्रतीक जोशी यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोखरक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


सीआरपीएफ आणि मध्य प्रदेश पोलीस भिडले

मध्य प्रदेशातही पश्चिम बंगालप्रमाणे स्थानिक पोलीस आणि केंद्रीय संस्था आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. छाप्प्यादरम्यान मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारचे पोलीस आणि सीआरपीएफचे जवान आपापसांत भिडले. याव्यतिरिक्त स्थानिक पोलिसांनी भोपाळ आणि इंदुरमध्ये आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणीदेखील घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळमध्ये प्लेटिनम प्लाझा येथे आयकर विभागानं छापा टाकत कारवाई केली. यादरम्यान, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफचे जवान आपापसांत भिडले.


कोण आहेत प्रविण कक्कड

काँग्रेसच्या अत्यंत जवळचे असलेले प्रविण कक्कड यांनी आपला सर्वाधिक काळ हा पोलीस सेवेत घालवला आहे. राष्ट्रपती पदकानं देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पण, आयकर विभागानं मारलेल्या छाप्यामुळं आता प्रविण कक्कड चर्चेत आले आहेत.

जीवाजी विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रविण कक्कड यांना गोल्ड मेडल मिळालं आहे. काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्य देखील केलं आहे.

प्रविण कक्कड काँग्रेस नेत्यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. 2004 ते 2011 या काळात त्यांनी कांतिलाल भूरिया यांचे ओएसडी म्हणून कम केलं आहे. शिवाय, कृषी आणि आदिवासी मंत्रालयामध्ये काम करण्याचा देखील त्यांना अनुभव आहे.

2011मध्ये कांतिलाल भूरिया मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रविण कक्कड यांनी निवडणुकांची जबाबदरी अंत्यत जबाबदारीनं पार पाडली. त्यांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसनं 2015मध्ये झाबुआ लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला. मोदी लाटेत त्यांनी ही कामगिरी केली होती.

कालानंतर कमलनाथ आणि प्रविण कक्कड यांची ओळख वाढली आणि कक्कड यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. 2018मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. यावेळी त्यांनी वॉर रूमच्या प्रभारीपदाची जबाबदारी पार पाडली.


बिर्याणीवरून आधी वाद..नंतर हाणामारी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 09:11 AM IST

ताज्या बातम्या